भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक व्यक्तिमत्त्व आणि सुमारे तीस वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्याची चळवळ ज्यांचा भोवताली फिरली, असे भारताचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी होय. सेवा, त्याग, समर्पण आणि संघर्ष हा गांधीजीच्या जीवनाचा मूलमंत्र होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 2024 ला 77 वर्षे पूर्ण झाली;पण एकही स्वातंत्र्य दिन गांधीजींच्या नावाशिवाय गेला नाही. अशा या महान व्यक्तीच्या कार्यावर आणि जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारा लेख मी आपणासमोर सादर करीत आहे.
मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ? गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? असे प्रश्न आपल्या मनात कधी ना कधी आले असतील. म्हणूनच त्याची प्रथम चर्चा करूया.
महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1915 साली उडी घेतली. त्यांनी इतक्या समर्पक वृत्तीने चळवळीत काम करण्यास सुरु केले की 12 एप्रिल 1919 रोजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा असा शब्द प्रथम उच्चार केला. तेव्हापासून लोक त्यांना ‘महात्मा’ असे म्हणू लागले.
स्वातंत्र्य चळवळीतील आणखी एक कणखर नेतृत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय. त्यांनी 6 जुलै 1944 रोजी रंगून येथून रेडिओवरून भाषण करताना महात्मा गांधींना राष्ट्रपिता महात्मा गांधी असे संबोधले. तेव्हापासून महात्मा गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी झालेत. भारतीय जनतेतून जोतिबा फुले आणि मोहनदास गांधी यांना महात्मा ही उपाधी मिळाली आहे.
महात्मा गांधी यांचे बालपण: Childhood of Mahatma Gandhi.
महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 रोजी सुदामापुरी येथे जन्म झाला. त्यांची आई पुतळीबाई, तर वडील करमचंद गांधी होते. त्यांच्या शिक्षणाची श्रीगणेशा राजस्थानमधील राजकोट येथे झाली.
गांधीजी लहानपणापासूनच प्रामाणिक आणि सत्यवादी होते. एकदा शाळा तपासणीच्या वेळी तपासणी अधिकाऱ्यांनी पाच शब्द लिहायला सांगितले होते.गांधीजींचा kettle हा शब्द चुकला होता. त्यांचे शिक्षक त्यांना कुणाचे तरी बघून लिहायला सांगत होते; पण त्यांनी तसे केले नाही. गांधीजींना सोडून वर्गातील सर्वांचे पाचही शब्द बरोबर आले.पण त्या प्रसंगातून गांधीजीच्या हृदयातील निर्मळपणाचा आणि प्रामाणिकपणाचा विजय झाला होता.
लहानपणी गांधीजी खूप घाबरट स्वभावाचे होते.रस्त्याने शाळेत जाताना सुद्धा ते घाबरत असत. वर्गात, हाइस्कूलमध्ये ते कधी फारसे चमक दाखवू शकले नाहीत. त्यावेळच्या परिस्थितीनुसार लहान वयातच म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. हायस्कूल मध्ये गेल्यावर गांधीजींची गणना ‘ढ’ विद्यार्थी अशी केली जायची. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांचे वडिलांचे छत्र हरवले: पण त्यांनी शिक्षण थांबवले नाही. सन 1887 मध्ये गांधीजी मॅट्रिक्यूलेशनची परीक्षा पास झाले.त्यापुढील शिक्षणासाठी ते विलायतेला(परदेशात) गेले. इंग्लंडमध्ये गांधींजींनी वकिलीचे शिक्षण घेतले. 10 जून 1891 रोजी गांधीजींना बॅरिस्टर ही वकिलातीतील उच्च पदवी मिळाली. आणि गांधीजी भारतात परतले. मुंबईत पहिला मुकदमा लढण्यासाठी गांधीजी कोर्टात उभे राहिले खरे; पण त्यांचे हातपाय लटलट कापू लागले.त्यांना काहीच बोलता आले नाही.
गांधीजींचा बालपणापासूनते बॅरिस्टर पदवी मिळेपर्यतचा जीवन प्रवास आपण पाहिला तर ,ते एक घाबरट ,नेभळट व्यक्तिमत्त्व होते. असेच काहीसे ते होते, पण पुढे हळूहळू या सर्व गोष्टींवर मात करुन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक कणखर नेतृत्व म्हणून ते मिरवू लागले.
आफ्रिकेत काय घडले ? What happened in Aafrika?
1893 मध्ये वकिली करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला बोटीतून तेरा दिवसांचा प्रवास करुन पोहोचले. तेथे डरबनहून पोरबंदरला रेल्वेने प्रवास करताना त्यांना वाईट अनुभव आला. गांधीजींनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढले असतानाही मॉरित्सबर्ग येथे एका अंमलदाराने ‘तुम्हाला पहिल्या वर्गाच्या डब्यात बसता येणार नाही’. म्हणून गांधीजींना बाहेर काढले. तेथे गोरे-काळे असा भेद होता. आफ्रिकेत भारतीयांना काळे समजत. गांधीजीनी स्टेशन मास्तरांकडे तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या वर्गानेच प्रवास केला.
आफ्रिकेतील परिस्थिती गांधीजींना हळूहळू समजू लागली होती. आफ्रिकेत वकिलेचे अनेक लढे देत गांधीजी 1896 साली भारतात परतले. दुसऱ्यांदा सहकुटुंब आफ्रिका दौरा केला आणि पुन्हा भारतात आल्यावर गोपाळकृष्ण गोखलेंशी संपर्क आला. त्यामुळे त्यांना भारतातील स्वातंत्र्य लढ्याची चळवळ समजायला मदत झाली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अप्रत्यक्ष सहभाग
गांधीजी आफ्रिकेत न्यायासाठी लढत होते. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देत होते. हळूहळू त्यांची लोकप्रियता वाढत होती. आफ्रिकेतील मजुरांसाठी दिलेला लढा यशस्वी केल्यावर ते भारतात आले .भारतात आल्यावर गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सातत्याने संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुणाला चालना मिळाली. निळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणे असो, की मजुरांच्या हक्कासाठी लढणे असो, गांधीजी सुरुवातीला भारतीयांच्या हक्कांसाठी लढत होते.स्वातंत्र्यासाठी नाही.
1920- देशाचे नेतृव: Leadership of Country
1920 सालापासून गांधीजींना आपली भूमिका बदलली. कारण त्यांच्याकडे संपूर्ण देशाचे नेतृत्व आले होते. भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला पाहिजे .यासाठी त्यांनी लढा पुकारायला चालू केले होते. लढ्यासाठी त्यांनी दोन मार्ग निवडले होते .एक सत्याग्रह आणि दुसरा सविनय कायदा भंग. अहिंसात्मक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळू शकते. यावर त्यांचा विश्वास होता.
मिठाचा सत्याग्रह /दांडी यात्रा.
सविनय कायदेभंग हे गांधीजींचे मुख्य अस्त्र होते. इंग्रजांनी मिठावर ज्यादा कर आकारला होता. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी गांधीजी मैदानात उतरले. 12 मार्च 1930 रोजी साबरमती येथील आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली. या यात्रेला सुरुवात झाली त्यावेळी गांधीजींबरोबर 78 अनुयायी होते. यात सरोजिनी नायडू पण होत्या. ही यात्रा 24 दिवस चालली. साबरमती आश्रम ते दांडी यात्रा अंतर 385 किलोमीटर होते. यात्रा पुढे सरकत जाईल तसे हजारो लोक या यात्रेत सामील झाले. 6 एप्रिल 1930 रोजी यात्रा दांडी येथे पोहोचली. गांधीजीनी चिमुटभर मीठ उचलून कायदेभंग केला. सविनय कायदेभंगाची ही सुरुवात होती. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहून इंग्रज सरकारने गांधीजींना अटक केले. याचे पडसाद वेगळेच उमटले. आंदोलनान तीव्रता अधिकच वाढली. इंग्रजांनी 60000 हून अधिक भारतीयांना तुरुंगात टाकले; पण आंदोलन थांबले नाही. शेवटी इंग्रजांनी गांधीजीची सुटका केली. आंदोलकांना सोडून दिले. आणि मिठावरील कर कमी केला .
चले जावची चळवळ
गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलेली सर्वांत मोठी चळवळ अशी या चळवळीची ओळख आहे. या चळवळीच्या माध्यमातून गाधीजींनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली.या आंदोलनाची सुरुवात मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी झाली. ब्रिटिशांना त्यांच्या कोणत्याही सरकारी कामात भारतीयांनी
सहकार्य करायचे नाही .असहकार पुकारायचा .असे ठरले होते. त्यानुसार आंदोलन सुरु झाले. गांधीजींनी या आंदोलनातून
करा किंवा मरा [Do or Die] असा जनतेला संदेश दिला.आंदोलन चिरडण्यासाठी इंग्रजांनी धरपकड सुरु केली होती.पण आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली होती. गांधीजींसह प्रमुख नेत्यांना इंग्रजांनी अटक केले होते. पण शेवटी हळूहळू इंग्रज नमत गेले आणि स्वातंत्र्याच्या हालचाली सुरु झाल्या.
1947 चे स्वातंत्र्य आणि गांधीजींचे उपोषण
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच वेळी भारत-पाक फाळणी झाली होती. फाळणी वरून हिंदू-मुस्लिम दंगे सुरु झाले .हे दंगे थांबवण्यासाठी गांधीजींना आंदोलन करावे लागले. म्हणजे आमरण उपोषण करावे लागले. शेवटी जनतेतून गांधीजींना प्रचंड सहानुभूती मिळाली आणि आंदोलनाची तीव्रता पूर्ण कमी झाली. भारत-पाक फाळणीच्या वेळी पाकिस्तानला 54 कोटी रुपये द्यायचे ठरले होते. सरकार स्थापन झाल्यावर सरकार टाळाटाळ करु लागले होते . शेवटी 1948 साली गांधीजींनी 54 कोटी साठी उपोषण केले आणि सरकारला पैसे देण्यास भाग पाडले.
गांधीजींची हत्या
30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींचे पाकिस्तान धार्जिन धोरण आहे, असा ठपका ठेवून नथुराम गोडसे या माथेफिरुने गांधीजींची हत्या केली.गांधीजीची हत्या करुन त्यांचा विचार दडपला गेला नाही. गांधीजी अमरच राहिले.