इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल असे जागतिक युद्ध चालू आहे.28 फेब्रुवारी 2026 पासून आज 13 दिवस झाले युद्धाचा भडका चालू आहे. अमेरिका आणि इस्रायल की दोन राष्ट्रे एकत्र आल्यानंतर इराणचा टिकाव जास्त दिवस लागणार नाही अशी परिस्थिती वाटत असताना अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांना इराणने जेरीस आणले आहे. भारताने गेल्या साठ वर्षांचे इराण भारत संबंध संपुष्टात आणल्यामुळे भारताकडे आज अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्याचाच एक परिणाम म्हणजे सध्या भारतात प्रचंड प्रमाणात घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या हॉटेल्स,खानावळी या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसची टंचाई ही मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जाणवत आहे. भारताने साठ वर्षांचा इराण भारत संबंध तोडून टाकला आणि भारतात पेट्रोल टंचाई निर्माण झाली. भारत आणि इस्रायल यांचे संबंध यापूर्वी कधीच चांगले नव्हते; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले आणि नवे संबंध निर्माण करून आले असले तरी इसरायमुळे आपल्या देशाचा कधीच फायदा झालेला नाही. याउलट इस्रायललने आपल्या देशाचा फायदा करून घेतलेला आहे.तेच अमेरिकेच्या बाबतीत झाले आहे आज आपल्याला तेलासाठी अमेरिका परवानगी देत आहे यासारखे दुर्दैव नाही.