About Us

नमस्कार ,
माझ्या वेबसाइटवर सर्व वाचकांचे सहर्ष स्वागत. माझे नाव संभाजी गोविंद पाटील असून मु. पो. सावर्डे (पाटणकर) ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर हा माझा पत्ता आहे. मी, विंडोज ऑफ न्यू थॉट्स.कॉम (windowsofnewthoughts.com) या वेबसाईटच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा सर्व वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम माझ्या लेखणीद्वारे मी करत आहे. भारतीय संस्कृतीला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. भारतीय सण, उत्सव कोणते आहेत? त्यांचे आपल्या जीवनात महत्त्व काय आहे ? ते आपल्या जीवनाशी निगडित कसे आहेत? याविषयी मी सविस्तर लेखन करणार आहे.

महाराष्ट्रातील,भारतातील गडकोट, किल्ले, ऐतिहासिक स्थळे, त्यांचा इतिहास, महत्त्व याबाबत सविस्तर लेखन करत राहणार आहे. भारत आणि भारताबाहेरील प्रेक्षणीय स्थळांची माहिती माझ्या प्रवास वर्णनातून आपल्यापर्यंत पोचवणार आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, रानभाज्यांचा परिचय, थोर समाजसुधारक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मराठी व्याकरण, वैदिक गणित, नोबेल पारितोषिक विजेते याबाबतही भविष्यात परिचय करून देणार आहे. windowsofnewthoughts.com या माझ्या वेबसाइटच्या माध्यमातून डिजिटल वाचन संस्कृतीचा विकास निश्चितच होईल, अशी माझी खात्री आहे.धन्यवाद.

माझा परिचयः

माझे नाव संभाजी गोविंद पाटील असून मी चाळीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब मुलांना ज्ञानसमृद्ध आणि सुसंस्कृत करण्यासाठी मी माझे आयुष्य वेचले आहे. भ्रमंती गड किल्ल्यांची, वैदिक गणित, मराठी, इंग्रजी व्याकरण, नोबेल पारितोषिक विजेते, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी माझी वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कामाची पोच म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने मला राष्ट्रीय पुरस्कार देऊन माझा गौरव केलाआहे.windowsofnewthoughts.com या माझ्या वेबसाइटच्या माध्यमातून किंवा संभाजी गोविंद पाटील मु.पो. सावर्डे (पाटणकर), ता. राधानगरी, जिल्हा, कोल्हापूर, राज्यः महाराष्ट्र या पत्त्यावर पत्रव्यवहार करून माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद