अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्‌टीवर एका छोट्याशा बेटावर Kulaba Fort वसलेला आहे. कुलाबा किल्ला हा एक महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासापासून किंचित अलग असलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. सागरी दुर्गाच्या यादीत अलिबाग किल्ल्याला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या कुलाबा किल्ल्याची माहिती करून घेणार आहोत. हा गड अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर समुद्रात एका खडकात वसलेला आहे.

गडाचे नाव: कुलाबा किल्ला.

समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 80 मीटर

किल्ल्याचा प्रकार: जलदुर्ग

ठिकाण : कोळीवाडा, अलिबाग जवळ

चढाईची श्रेणी : सोपी

जवळचे गाव : अलिबाग

सध्याची अवस्था: बिकट

स्थापना : 1682

अलिबागहून अंतर : 3 किमी.

कुलाबा किल्ला पाहायला कसे जाल ? How to go to See Kulaba Fort ?

* अलिबागचा किल्ला रायगडावरून 109 किलोमीटर अंतरावर आहे.

* महाडहून कुलाबा किल्ला 109 किलोमीटर अंतर आहे.

पेणहून कुलाबा किल्ला पाहायला जाता येते. हे अंतर 31 किलोमीटर आहे.

* सिंधुदुर्ग किल्ला पाहून कुलाबा किल्ला पाहायला जायचे असेल तर सिंधुदुर्ग ते कुलाबा किल्ला 420 किलोमीटर आहे. चिपळुण ते कुलाबा किल्ला अंतर 196 किलोमीटर आहे.

कुलाबा किल्ल्याचा इतिहास: History of Kulaba Fort:

अलिबाग तालुक्याला जवळजवळ 30 किलोमीटरची समुद्र किनारपट्‌टी लाभलेली आहे. या समुद्र किनारपट्‌टीवरच एका छोट्याशा बेटावर हा किल्ला बसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1680 साली किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. असे असले तरी 1680 पूर्वीसु‌द्धा या किल्ल्यावर बांधकाम कोणीतरी केलेले असावे. सिंधुदुर्गसारखा पूर्णतः नवीन किल्ला महाराजांनी बांधलेला नाही.

इ.स. 1682 साली छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात कुलाबा किल्ला बांधून पूर्ण झाला. कुलाबा किल्ल्याचा पहिला किल्लेदार होण्याचा मान कान्होजी आंग्रे यांना मिळाला होता.

सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे पेशव बाळाजी विश्वनाथ होते. छत्रपतींच्या आज्ञेनुसारच बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी आंग्रे यांच्यात करार झाला. त्या करारानुसार कुलाबा किल्ला कान्होजी आंग्रे यांना देण्यात आला. त्यापूर्वीच छत्रपती राजाराम महाराजांनी 1698 मध्ये कुलाबा किल्ल्याचा किल्लेदार म्हणून कान्होजी आंग्रे याची निवड केली होती.

4 जुलै 1729 हा दिवस कुलाबा किल्ल्यासाठी काळा दिवस ठरला. या दिवशी कान्होजी आंग्रेचे निधन झाले. एका कुशल जलदुर्गराजाचा हा अंत म्हणजे मराठ्यांच्या सागरी आरमाराचे मोठे नुकसान झाले. कान्होजीच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा सेखोजी हा कुलाबा किल्ल्याचा दुसरा किल्लेदार झाला. पण दुर्दैवाने 1732 मध्ये सखोजीचा मृत्यू झाला. खरे तर कान्होजीच्या मृत्यूनंतरच कुलाबा किल्ल्याला घरघर लागली होती.सेखोजीच्या मृत्यूनंतर आंग्रे घराण्यात किल्ल्याच्या हक्कावरून गृह कलह सुरु झाला. मानाजी व येसाजी आंग्रे यांना गडावरची वेगवेगळी जबाबदारी सोपवली होती; पण त्यांच्यातच सुंदोपसुंदी सुरु झाली. यातच विजयदुर्ग ताब्यात असलेल्या संभाजी आंग्रे याने कुलाबा किल्ल्यावर स्वारी केली. पोर्तुगीजांनी संभाजी आंग्रेची बाजू घेतली. तर पेशव्यांनी मानाजी आंग्रेला पाठिबा दिला. या गृहकलहात मानाजी आंग्रे याचा विजय साला.

इ.स. 1747 मध्ये जिंजीच्या सिद्दीने कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी मानाजी आंग्रे किल्लेदार होता. सिद्‌दी हा कसलेला दर्यावर्दी होता. सि‌द्दी घराण्याने अंजिरा किल्ला नेहमीच अजिंक्य ठेवला होता; पण त्यालाही कुलाबा किल्ल्याच्या लढाईत पराभवाला सामोरे जावे लागले. या लढाईत मानाजी आंग्रेचा विजय झाला. इ.स. 1759 साला मानाजीचा मृत्यू झाला. त्यानंतर आंग्रे घराण्यात पुन्हा कलह सुरु झाला.मानाजीचा मृत्यू झाल्यानंतर रघूजी आंग्रे किल्लेदार बनला. पुढे गृहकलहात किल्लेदार पद वारंवार बद‌लत राहिले. शेवटी राघोजी आंग्रेचा मुलगा कान्होजी सर्वसत्ताधीश झाला (1817). त्यानंतर पुढे 1850 मध्ये आंग्रे घराण्याला वंशज नसल्याने इंग्रजांनी त्यांचे राज्य खालसा केले

कुलाबा गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे : Spectacular places of Kulaba Fort

कुलाबा किल्ल्याची अवस्था थोडी बिकट झाली असली तरी तेथील पाऊलखुणा इतिहासाच्या साक्षीदार असतात. त्याच पाऊलखुणांचा आपण वेध घेणार आहोत.

गडाचे प्रवेशद्वार: The Gate Of Kulaba Fort

कुलाबा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार समुद्र‌किनाऱ्याच्या बाजूस ईशान्य दिशेला आहे. दरवाजाच्या कमानीवर कमळाकृती शिल्पे कोरलेली आहेत. तसेच मोर, हरिण,हत्ती, शरभ यांची शिल्पे आढळतात.

गडावरील बुरुज: Towers of the Kulaba Fort.

बुरुज हे प्रत्येक गडाचे आधारस्तंभ असतात. संरक्षक असतात.भक्कम बुरुज, तेवढी गडाची सुरक्षितता अधिक असते. कुलाबा किल्ल्यावर एकूण सतरा बुरुज आहेत. त्यापैकी काही बुरुजांची नावे सांगता येईल. गणेश बुरुज, हनुमंत बुरुज, पिंजरा बुरुज, सूर्य बुरुज अशी काही नावे सांगता येतील.

श्री. सि‌द्धीविनायक गणेश मंदिर : Ganesh Temple, Kulaba Fort:

गडावर रघुजी आंग्रे सर्वसत्ताधीश झाल्यानंतर त्याने 1759 साली सिद्‌धीविनायकाचे गणेश मंदिर बांधले.हे गणेश मंदिर 20 मीटर लांब 6 मीटर रुंद आणि 15 मीटर उंच असून मंदिरातील गणेशमूर्ती संगमरवरी आहे.

* मारुती मंदिर व महादेव मंदिर : Maruti Temple and Mahadev Temple.

प्रत्येक गडावर महादेवाचे मंदिर असतेच. शिवरायांची ‘ हर हर महादेव ‘ ही गर्जना बरेच काही बोलून जाते. या गडावरही महादेव मंदिर आहे. शिवाय हनुमान मंदिर सुद्धा आहे.

गडावरील खाण्यापिण्याची व राहण्याची सोय :

गडावर कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची सोय नाही. येथे मुक्काम करणे सुद्धा धोक्याचे आहे.

Leave a comment