राज्यस्थानचे वैभव असणारा आणि वैभवशाली इतिहास, पराक्रमाच्या ‘गाथा, मेवाड राजघराण्याची दीर्घकाळ सत्ता या सर्वे बाबींचा साक्षीदार असलेला किल्ला म्हणजे Chittorgarh होय. सुमारे सातशे एकरात पसरलेला चितोडगडचा विशाल किल्ला पाहताना डोळे विस्फारून जातात. जगातील सर्वात मोठा किल्ला अशी चितोडगडची ओळख करून दिली तर ती चुकीची ठरत नाही. मेवाडच्या राजघराण्याला लग्नात आंदण (हुंडा) रुपात मिळालेला हा चितोडगड [Chittorgarh ] मेवाडच्या राजधानीचे ठिकाण बनले होते. संपूर्ण मेवाडच्या राजघराण्याचा इतिहास या चितोडगडच्या भोवताली फिरतो आहे. म्हणूनच आपण या चितोडगड़ची माहिती करून घेणार आहोत.
चितोडगडची ठळक माहिती: Highlights Of Chittorgarh
गडाचे नावः. चितोडगड
पूर्वीचे नाव :चित्रनगरी,चित्तोर.
समुद्र सपाटीपासून उंची: 395 मीटर
डोंगररांग :….
स्थापना : चित्रांगद मौर्य. इ. स.सातवे शतक.
जवळचे ठिकाण : चितोडगड सध्याची अवस्था :चांगली
चढाईची श्रेणी : मध्यम ,सोपी
जिल्हा : चित्तोडगड
चित्तोडगड पाहायला कसे जायचे? How to go to see Chittorgarh Fort?
* तुम्ही चित्तोडगड शहरात असाल तर सिटी पॅलेस [city Palace] पासून 6.5 किलोमीटर चित्तोडगड आहे.
* चित्तोडगड शहरातील चंदनपुरा (Chandanpura) पासून 5 किलोमीटर अंतर आहे
* राज्यस्थान राज्यातील उदयपूर [ Udaypur] शहरापासून चित्तोडगड किल्ला 111 किलोमीटर अंतरावर आहे.
* राज्यस्थानची राजधानी जयपूरपासून चितोडगड 335 किलोमीटर अंतरावर आहे.
* मध्य प्रदेशातील इंदोर [Indore] पासून चिलोडगडचा किल्ला 323 किलोमीटर अंतरावर आहे.
चित्तोडगडचा प्राचीन इतिहास आणि प्राचीन नाव: Old name and old History of Chittorgarh Fort.
चित्रांगध मौर्य [Chittorgarh Mori]
इ. स. सातव्या शतकात चित्रांगध मोर्ग याची सत्ता चित्राकोट नगरीत होती. चित्राकोट नगरीचे पूर्वीचे नाव चित्रनगरी असे होते. या ठिकाणी चित्रांगधने गड बांधून घेतल्यामुळे या नगरीचे नाव चित्राकोट असे पडले. चित्रांगध राजानेच ही नगरी वसवल्यामुळे या नगरीचे नाव चित्रनगरी असे ठेवण्यात आले. गड बांधल्यानंतर तेथील गडाला चित्राकोट असे नाव दिले. चित्रांगध राजाने बांधलेला कोट (गड) म्हणजेच चित्राकोट होय. पुढे या गडाचेच नाव चित्रनगरीला पडले. आणि ही नगरी चित्राकोट नावाने ओळखू लागली. चित्राकोटचे पुढे अपभ्रंश होऊन चित्तोर आणि चित्तोरचे चित्तोड असे झाले. चित्तोडचे नाव चित्तोडगड असे झाले. आणि आजही हेच नाव प्रचलित आहे.
चित्तोडगडचा इतिहास : [History of Chittorgarh Fort]
इ.स. सातव्या शतकात चित्रांगध या राजाने चित्तोडगड किल्ला [Chittorgarh Fort] बांधला. मेवाडचा रजपूत बाप्पा रावल आणि मौर्यवंशीय राजा राजा मान मौर्य यांच्यात लढाई झाली. या लढाईत राजा मानचा पराभव झाला. पराभूत राजाकडून खंडणी म्हणून काही तरी घेण्याची पद्धत होती. राजा मान याने आपली मुलगी मेवाडच्या राजाला दिल्ली. आणि आंदण (हुंडा) म्हणून चित्तोडगड दिला. पुढे मेवाडच्या राजांनी आपले बस्तान चित्तोडगडावर बसवले. आणि पुढे मेवाडची राजधानी चित्तोडगड म्हणून घोषित केली. मेवाडच्या अनेक पराक्रमी राजांनी आपले बस्तान अधिक बळकट करण्यासाठी चित्तोडगडाची वेळोवेळी पुनर्बांधणी केली. मेवाडच्या राजघराण्याच्या देदीप्यमान प्रराक्रमाचा साक्षीदार म्हणून आजही हा चित्तोडगड (Chittorgarh Fort] ताठ कण्याने उभा आहे. जवळपास 1000 हून अधिक वर्षे आपली सत्ता टिकवणारे मेवाडचे राजघराणे यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या देदीप्यमान कारकीर्दीत मेवाडच्या राजघराण्याला चांगले-वाईट असे अनेक अनुभव अनुभव आलेत.
इ.स. 734 मध्ये बाप्पा रावल या मेवाडच्या रजपूत राजाने चित्तोडगडला आपली सत्ता स्थापन केली. या नव्या गडाचे मेवाड राज्याच्या विलिणीकरणामुळे मेवाड सत्तेचा अजमेर ते गुजरातपर्यंत पसरली. इ स नवव्या शतकापासून चित्तोडगड जिंकण्यासाठीच मोगलांनी बरीच आक्रमणे केलीत.पण मेवाडच्या राजांनी ही आक्रमणे परतवून लावली.
इ स 1303 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने मेवाडचा राजा रतन सिंह याचा पराभव करून प्रथमच चितोड किल्ला ताब्यात घेतला. यावेळी राजपूत राण्या आणि राजकन्यांनी किल्ल्यावरून उड्या मारून आत्महत्या केली. परंतु शत्रूने त्यांना पकडले नाही. 1326 मध्ये गेहलोत घरण्यातील हमीर सिंगने किल्ला ताब्यात घेतला.
मेवाडचा राजा राणा कुंभा हा हुशार होता. त्याने सैन्याची पुनर्बांधणी केली आणि मेवाडचा किल्ला ताब्यात घेतला. इ स 1433 ते 1468 पर्यंत तो मेवाडचा राजा होता. सोळाव्या शतकात मेवाड राजवंश मजबूत स्थितीत होते.
इ.स. 1535 मध्ये गुजरातच्या सुलतान बहादूरशाहने चित्तौडगडावर हल्ला करून चितोडगड ताब्यात घेतला.
चित्तोडचा राजा राणा प्रताप सिंह हा पराक्रमी राजा होता. इ स. 1527 मध्ये बाबर आणि राणा प्रताप यांच्यातील युद्धात राणा प्रतापचा पराभव झाला.त्यावेळी राण्या आणि राजकुमारी यांनी आत्मदहन केले;पण त्या शत्रूच्या हाती लागल्या नाहीत. 1567 मध्ये अकबरने राणा उदयसिंग वाचा पराभव करून चित्तोडगड ताब्यात घेतला. इंग्रज येईपर्यंत चित्तोडगड मुघलांच्या ताब्यात होता.
चित्तोड गडाची वास्तुकला: ,Structure and Architecture of Chittorgarh
सुमारे 700 एकरमध्ये पसरलेला चित्तोडगढचा परीघ 13 किमीचा आहे. गडाला हनुमान दरबाजा, गणेश दरबाजा, लक्ष्मण दरवाजा आणि इतर सात दरवाजे आहेत. गडाच्या भिंती मजबूत असून त्या चुन्यात बांधलेल्या आहेत. काही ठिकाणी उंची 500 मीटर पर्यंत आहे. येथे 19 मंदिरे, 20 पाण्याची टाकी, सात दरवाजे आणि चार स्मारके आहेत.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Famous and spectacular Places of Chittorgarh
राणा कुंभ पॅलेस : Rana kumbh Palace: Chittorgarh
गडावर अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यांतील राणा कुंभ पॅलेस हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मेवाडचा राजा राणा कुंभ (1433 ते 1468) याने हा पॅलेस बांधून घेतला. या पॅलेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम सुरज दरवाजा लागतो. उदयपूरचे संस्थापक महाराणा उदयसिंह आणि संत मीराबाई सुद्धा या महालात राहिल्या आहेत. राणी’ पद्मिनी हिने याच महालाच्या पायथ्याशी आत्मदहन करून घेतले होते.
पद्मिनी महाल: Padmini Mahal, Chittorgarh
चित्तोडगडाच्या दक्षिणेला पांढरी तीन मजली इमारत आहे. हाच तो पद्मिनी महाल होय. राणा रतन सिंग याची राणी पद्मिनी ही अत्यंत देखणी होती.याच महालात अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मिनीला पाहिले आणि तो बेचैन झाला होता. यातूनच पुढे रतनसिंह अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात युद्ध झाले .चित्तोडगड खिलजीने चेतला; पण राणी पद्मिनीने आत्मदहन केल्यामुळे त्याच्या हाती काहीही लागले नाही. अशा होत्या रजपूत स्त्रिया स्वाभिमानी!
विजयस्तंभ : Vijaystambh, Chittorgarh
विजय स्तंभ म्हणजे मेवाडच्या राजघराण्याच्या विजयाचे आणि सामर्थ्यांचे प्रतीक आहे. इ स 1458 से 1468 या दरम्यान राणा कुंभा ने महमूद शाह खाजीवर विजय मिळवला होता. या विजयाच्या सन्मानार्थ चित्तोडगडावर विजय स्तंभ उभारलेला आहे. हा विजयस्तंभ 122 फूट उंचीचा असून हा नऊ मजली स्तंभ आहे. वरील मजल्यांवर जाण्यासाठी गोलाकार 157 पायऱ्या आहेत.
कीर्ती स्तंभः Kirti stambh, Chittorgarh
12 व्या शतकात बांधलेला हा कीर्ती स्तंभ आहे. या स्तंभाची उंची 25 मीटर आहे. हा कीर्तिस्तंभ जैन तीर्थकर आदिनाथ ला समर्पित केला आहे.
UNESCO ने 2013 साली चित्तोडगडला जागतिक वारसा स्मारक म्हणून घोषित केला आहे.