जयगड दुर्ग:, जयपूर / Jaigarh Fort Jaipur

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे वैभव असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले डोंगरी आणि सागरी आहेत. महाराष्ट्राबाहेर भारतातही अनेक राज्यात किल्ले आहेत. राजस्थान हे राज्य असे आहे की या राज्याने अनेक रजपूत पराक्रमी राजे जन्माला मानले आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा अनेक मजबूत आणि विशाल किल्ले आहेत. राजस्थानच्या जयपूर शहरालगत असलेला भव्य किला म्हणजे Jaigarh Fort  होय.हा किल्ला विशाल आणि मजबूत आहे. याच किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाच : जयगड [Jaigarh]

समुद्रसपाटीपासून उंची: 500 मीटर

गडाचा प्रकार. : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम

जवळचे शहर :जयपूर

जयपूर पासून अंतर : बिर्ला मंदिर पासून 14 किमी.

स्थापना. :1667

सध्याची स्थिती:चांगली

संस्थापक ;उदयसिंह (पहिला)

पर्वत रांग. :अरवली

जयगड दुर्ग पाहायला कसे जाल ? How to go to see Jaigarh Fort ?

तुम्ही जयपूर शहरात असाल तर, या शहरातील बिर्ला मंदिर पासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर जयगड दुर्ग आहे.

* जयपूर या शहराजवळ असलेल्या हाथी गावापासून जयगड किल्ला केवळ 5 किलोमीटर दूर आहे.

* जयपूर शहरातील प्रसिद्‌ध ‘हवामहल’ ठिकाणापासून जयगड दुर्ग [ Jaigarh Fort ] 10 किलोमीटर अंतरावर आहे.

* तुम्ही चितोडगड पाहून जयपूरला जात असाल तर चितोड‌गड पासून जयगड 334 किलोमीटर आहे.

* राजस्थान मधील कोटा’ यां प्रसिद्‌ध ठिकाणापासून जयगड 268 किलोमीटर अंतरावर आहे.

जयगड किल्ल्याचा इतिहास : History Of Jaigarh Fort, Jaipur

जयगड किल्ल्याला खूप मोठा प्राचीन इतिहास नसला तरी मध्ययुगीन काळात उद‌यास आलेला हा किल्ला आजही अरवली पर्वताच्या डोंगरावर डौलाने उभा आहे.

जयगडचा किल्ला राजा जयसिंह पहिला याने 1667 साली बांधला. या किल्ल्यापासून जवळच असलेल्या (2.5 किमी) अमेर (अंबर) किल्ल्याला supported किल्ला म्हणून राजा जयसिंह याने बांधला होता.जयगड किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे, या टेकडीवर गरुडांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. यामुळे या टेकडीला ईगल टेकडी असे नाव पडले होते. यावरुनच हा किल्ला सुद्धा ईगल फोर्ट या नावाने ओळखला जातो. इ.स. 1726 मध्ये राजा जयसिंग दुसरा याने या किल्ल्याची पुनर्बांधणी करून हा जयगड किल्ला आणखी मजबूत केला. सुमारे 3 किलोमीटर परिसरात जयगड दुर्ग पसरला असून हा Jaigarh Durg समुद्र सपाटीपासून 500 मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपारीत असलेले किल्ले मुळातच नैसर्गिक उंचीवर आणि सुरक्षित आहेत. तसे जयगडला नैसर्गिक उंची कमी लाभली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या मजबुती करणाकडे आणि सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले आहे.

मिर्झा राजा जयसिंग आणि महाराष्ट्राचा शिवकाळातील इतिहास सर्वांना ज्ञात आहेच. स्वराज्यावर आलेले मोठे संकट म्हणजे मिर्झा राजे जयसिंग होय. यानेच या किल्ल्याच्या पुनर्बांधणी बरोबरच जयपूर हे शहर वसवले. येथे शहर वसवणे हे राजा जयसिंगचे स्वप्न होते. मिर्झा राजा जयसिंग हा औरंगजेबाचा मांडलिक राजा होता.

चित्तोडगड: Chittorgarh

पुढे राजा जयसिंग पुत्र मानसिंग गादीवर बसला. मानसिंग आणि मुघल यांचा असा करार झाला की मानसिंग जे राज्य जिंकेल ते मुघलांच्या अधिपत्याखाली असेल; पण जिंकलेला खजिना मानसिंगचा असेल.मानसिंगने अफगाणिस्तान आणि इतर ठिकाणी विजय मिळवल्यानंतर मिळालेला खजिना याच किल्ल्यात ठेवला होता. जयगड किल्ला हा विजेता (Victory) किल्ला म्हणून ओळखला जात होता. कारण हा किल्ला कोणीही आक्रमण करून जिंकू शकत नव्हता. हा किल्ला वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी चक्राकार भिंती आहेत.

इंग्रजांच्या राजवटीत जयगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रज या किल्ल्याचा वापर लष्करी तळासाठी करत असत.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Famous Places of Jaigarh Fort

1) जयबान तोफ :Jaiban Toph

आशिया खंडातील सर्वांत मोठी आणि सर्वात लांब तोफ अशी ओळख असेलेली ही जयबान तोफ जयगडावरच बनवण्यात आली. ही तोफ तिसरा सवाई जयसिंग राजाने बनवलेली असल्याचे दिसते. इ.स. 1720 मध्ये ही तोफ बनवून पूर्ण झाल्यानंतर या तोफेची चाचणी घेण्यात आली होती. या जयबान तोफेतून सुटलेला दारुगोळा 35 किलोमीटर अंतरावर जाऊन पडला होता. त्या ठिकाणी मोठा खड्डा पड‌ला होता. जयगड किल्ल्याच्या नावावरूनच या तोफेला सुद्धा जयबान तोफ, असे नाव दिले आहे. या तोफेची लांबी तांबी 31 फूट असून वजन 50 ते 55 टन आहे. यावरुन या तोफेचा रुद्रावतार लक्षात येतो.

कर्नाटकातील विजापूर येथे असलेली मलिक-ए- मैदान तोफेची लांबी 15 फूट असली तरी तिचे वजन 50 टन आहे असे मानले जाते. जयगडावरील जयबान तोफ निमुळती आणि लांबलचक आहे..

2. अंबर किल्ला: Amber Fort:

अंबर किल्ल्याला supported Fort म्हणून जयगड दुर्ग बांधला होता. या अंबर किल्ल्याची रचना खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. वाळूच्या दगडांमध्ये बांधलेला हा अंबर किल्ला पाहायचा आणि मग पुढे जाऊन जयगड पाहायचा. हा किल्ला सुद्धा राजस्थानचा शान असून राजा जयसिंग घराण्याची सत्ता राखण्यास या किल्ल्याची वेळोवेळी ही मदत झाली आहे. रजपूत राजाच्या भव्यतेचे आणि प्रराक्रमाचे प्रतीक म्हणजे अंबर किल्ला होय.

3. शिलादे‌वी मंदिर-Shiladavi Temple.

शिलादे‌वी मंदिर हे खूप वर्षांपासूनच या अंबर किल्ल्यामध्ये आहे. हे मंदिर कालिमातेचे आहे. ही काली माता म्हणजे पार्वतीची बहीण होय. कालिमालेचे वास्तव्य दक्षिण भारतात अधिक होते. पार्वतीच्या आई-वडिलांना काळी मुलगी झाल्यामुळे (दीर्घायुषी होण्याचे औषध खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम) तिला त्यांनी दक्षिणेत आणून सोडली. हीच ती कालीमाता होय. राजपूत राजपुत्राने बंगालच्या राजकन्येशी विवाह केला होता. तिच्या आग्रहाखातर या अंबर गडावर शिलादेवी मंदिर बांधले होते. कदाचित या राजकन्येचे नाव शिलादेवी असण्याची शक्यता आहे.

(4) जयगडावरील बालेकिल्ला

जयगडावर सर्वांत उंच ठिकाणी असलेला हा बालेकिल्ला आजही पाहायला मिळतो. या बालेकिल्ल्याचे बांधकाम आजही मजबूत स्थितीत पाहायला मिळते. सध्या या बालेकिल्ल्याला तार कंपाऊंड केले आहे. या बालेकिल्ल्याचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बुरुजांच्या मधोमध या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लपलेले आहे. येथेच सभोवताली खंद‌क खणून बालेकिल्ला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. येथे प्रवेशद्वाराच्या दरवाजावर कमलपुष्पे खोद‌लेली आहेत. तट‌बंदीच्या मधल्या जागेत तीन मजली इमारत आहे.

एकंदरीत राजस्थानी बांधकामाची आणि कला कुसरीची छाप असलेला हा जयगड आणि लागूनच असलेला अंबर किल्ला पर्यटकांनी आणि इतिहास प्रेमी लोकांनी आवश्य पाहून घ्यावा. या गडावरील खास आकर्षण असलेल्या जयबान तोफेसोबत फोटो काढून घ्यायला विसरू नका.

Leave a comment