1857 च्या उठावात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ते बहाद्दूर आणि लढवय्ये राजे, सेनापती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई [Jhansi Rani Laxmibai), तात्या टोपे बहादूर शाह जफर, मंगल पांडे, नाना साहेब, मानसिंग कुंवरसिंग यांनी नेतृत्व केले असले तरी या सर्वांनी बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 चा उठाव केला . मंगल पांडे याने बंडाची ठिणगी टाकली. Jhansi Fort हा उत्तर प्रदेशातील बंगीरा डोंगरावर बांधलेला आहे. या किल्ल्याच्या समोरच्या टेकडीवर एक मंदिर होते. त्या मंदिराचा आसरा घेऊन इंग्रज लढत होते. पुढे काय झाले ते पाहू.
गडाचे नाव : झाशीचा किल्ला (Jhansi Fort)
समुद्र सपधिवासून उंची: 1080 मीटर
डोंगर रांग : बंगारी डोंगर
किल्ल्याचा प्रकार : भुईकोट/डोंगरी.
जवळचे गाव : झाशी झाशीचे
जुने नाव: बळवंत नगर
जिल्हा : झाशी
राज्य : उत्तर प्रदेश
स्थापना : इ.स. 11 वेशतक.
गडाची अवस्था : चांगली
झाशी रेल्वे स्टेशन अंतर : 3 किलोमीटर.
झाशीला कसे जायचे ? How to go to see Jhansi?
झाशीचा किल्ला उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ या शहरापासून झाशी 315 किलोमीटर अंतरावर आहे. लखनऊ ते झाशीचा प्रवास रेल्वेने करता येते.
तुम्ही महाराष्ट्रातून झाशीला जात असाल तर मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरचा किल्ला पाहून झाशीला जाता येते. ग्वाल्हेर ते झाशी अंतर 100 किलोमीटर आहे.
मध्य प्रदेशातील शिवपुरी ते झाशी अंतर 17 किलोमीटर आहे.
मध्य प्रदेशातील ललितपुर पासून झाशीचा किल्ला 178 किलोमीटर अंतरावर आहे.
झाशी हे ठिकाण असे आहे की तेथे रेल्वे स्टेशन आहे.झाशीला रेल्वेने जाता येते.
झाशीच्या किल्ल्याची रचना: Structure of Jhansi Fort:
झाशीचा किल्ला एका छोट्याशा टेकडीवर बांधलेला आहे. बंगारी डोंगरावर बांधलेला किल्ला अत्यंत मजबूत आहे. किल्ल्याच्या चहुबाजूंनी मजबूत तटबंदी बांधलेली असून किल्ल्याचे बांधकाम दगड, वाळू, चुना, शिसे या साधनांचा वापर करून बांधलेले असल्यामुळे 11 व्या शतकात बांधलेला किल्ला आजही सुस्थितीत आहे. गडावरील बिजली तोफ सर्व दिशांना फिरवण्याची सोय होती.
झाशीच्या किल्ल्याचा इतिहास: History of Jhansi Forts
उत्तर प्रदेशातील बंगारी टेकडीवर बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्यामुळे झाशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. झाशीचा किल्ला जवळ जवळ 1000 वर्षापूर्वी बांधलेला असूनही आजही तो मजबूत स्थितीत आहे. या गडाची वेळोवेळी दुरुस्ती झाली असल्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे चांगल्या प्रकारे जतन झाले आहे. इ.स. 11 व्या शतकापासून 17 व्या शतकापर्यंत झाशीचा किल्ला कऱ्हाडे ब्राह्मण राजांकडे होता. त्यांचीच सत्ता या गडावर होती.
इ.स. 1728 साली झाशीचा किल्ला छत्रसाल राजाकडे होता. हा गड ताब्यात घेण्यासाठी महंमद खान बंगशने गडावर हल्ला केला होता. योगायोगाने बाजीराव पेशवा त्या वेळी उत्तर भारतात होता. राजा छत्रसालने बाजीराव कडे मदत मागितली. बाजीरावने छत्रसालला मदत केली.मराठ्यांनी महमंद खान बंगशाला पळवून लावले. गड छत्रसालकडे राहिला;पण बाजीराव आणि छत्रसाल यांच्यातील अंतर्गत कराराप्रमाणे छत्रसालने गड बाजीरावाला दिला आणि नजराणा म्हणून आपली औरस कन्या स्वरुप सुंदरी मस्तानीला बाजीरावकडे सोपवले. बाजीरावने हा नजराणा आनंदाने स्वीकारला.
इ.स. 1742 मध्ये मराठयांचा नारो शंकर हा झाशीचा सुभेदार बनला.
त्याने किल्ला मजबूत करण्यासाठी गडावर अनेक बांधकामे केली. त्यानंतर बाबुलाल कन्हाई, विश्वासराव, लक्ष्मण रघुनाथराव (द्वितीय),यांनी सुभेदारी निभावली होती. शिवराव यांनी झाशीच्या किल्ल्याची सुभेदारी निभावली होती.
इस 1838 मध्ये ब्रिटिशांची सत्ता होती; पण गंगाधर रावला झाशीचा राजा म्हणून स्वीकारले, गंगाधरराव हे इंग्रजांचे मांडलिक राजा होते. गंगाधर राव नेवाळकर यांचा विवाह मणिकर्णिका तांबे हिच्याशी झाला होता. मणिकर्णिकेचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी झाला होता. मणिकर्णिकेला (Manikarnika) लहानपणी सगळेजण मनू असे म्हणत झाला होते.
में 1842 मध्ये गंगाधरपंत नेवाळकर आणि माणिकर्णिका यांचा विवाह झाशीच्या किल्ल्यावर संपन्न झाला होता. विवाहानंतर तिचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले होते. गंगाधर आणि लक्ष्मीबाई यांना 1851 साली मुलगा झाला. त्याचे नाव दामोदर असे ठेवण्यात आले. अंतर्गत कलह आणि द्वेषाचा बळी दामोदर राव ठरला. अवघ्या चार महिन्यांचा दामोदर असताना त्याचा विषबाधेने मृत्यू आला. झाशीच्या वारसाची कळी उमलण्यापूर्वीच खुडली गेली. गंगाधर पंत वारंवार आजारी पडत असल्याने त्यांना पुन्हा संतान होण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे गंगाधर व लक्ष्मीबाई यांनी गंगाधरच्या चुलत भावाचा- वासुदेवाचा मुलगा आनंद याला दत्तक घेतले आणि गृहकलह आणखीन उफाळून आला. 1853 मध्ये गंगाधर पंताचा मृत्यू झाल्यामुळे राणा लक्ष्मीबाईने दामोदर राव ला गादीवर बसवून राज्य कारभार सुरु केला.
दामोदर रावाच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाई आपल्या राणी महालातून कारभार पाहत असे. तिने साध्या वेशात राहणे पसंत केले होते. राणीचा दीर धुराजीराव हा इंग्रजांना सामील होता. इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर केल्यावर झाशीच्या राणीने
‘मेरी झाँशी नहीं दूंगी।
असे इंग्रजांना ठणकावून सांगितले.गड सोडला नाही आणि इंग्रजांनी देऊ केलेली पेन्शन सुद्धा नाकारली.यामुळे इंग्रज आणि झाशीची राणी यांच्यात संघर्ष पेटला होता. डलहौशीने किल्ला सोडण्याचे आदेश दिले होते; पण राणीने किल्ला सोडला नाही.
1857 च्या उठावात राणी लक्ष्मीबाई अग्रेसर होती.राणीचा सेनापती तात्या टोपेने रान उठवले होते.एप्रिल 1858 मध्ये इंग्रजांनी किल्ल्याला वेढा दिला होता.त्यावेळी झाशीच्या राणीने जोरदार प्रत्युत्तर दिले.राणी भुयार मार्गाने जाण्याचा विचार करत होती. पण दीर धुराजीराव यांच्या फितुरीमुळे इंग्रजांनी भुयारी मार्ग रोखला होता.त्याच मार्गाने गडावर प्रवेश करण्यासाठी इंग्रज भुयार मार्गात घुसले होते.पहिली तुकडी गडावर पोहोचली.आणि तुटपुंज्या सैन्यांमुळे अखेर एके दिवशी गडावरून आपल्या दामोदरला पाठीशी बांधून राणीने घोड्यावरुन उडी घेतली आणि सर व्ह्यू रोज चा वेढा कापत राणी वेढ्यातून निसटली आणि ग्वाल्हेरला मदतीसाठी आली. पण ग्वाल्हेरच्या राजाने इंग्रजांना घाबरून मदतीस नकार दिला. राणीने कडाडून ग्वाल्हेरच्या राजाच्या षंढत्वावर टीका केली आणि आपल्याजवळ आहे त्या सैन्यानिशी इंग्रजांशी लढली. लढता लढता तिने बलिदान दिले; पण इंग्रजांच्या हाताशी लागली नाही. अशी होती झाशीची राणी लक्ष्मीबाई मर्दानी झाशीवाली!!!!
चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी।
खूब लड़ी मर्दानी वह तो झाशीवाली रानी थी।
झाशीच्या गडावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places on Jhansi fort.
1.राणीचा पुतळा Statue of Laxmibai.
झाशीच्या गडावर प्रवेश करताच प्रथम दर्शनी झाशीची राणी लक्ष्मीबाईचा घोड्यावर स्वार झालेला पाठीशी पुत्र दामोदर नंग्या तलवारीनिशी लढाईच्या आवेशातील पुतळा पाहून मन भरून येते. क्षणभर अंगात वीज संचारते.कोल्हापुरातील ताराबाई पार्कात जसा महाराणी ताराबाईचा पुतळा आहे,तसाच काहीसा झाशीच्या राणीचा पुतळा आहे. झाशीच्या राणीला सॅल्युट मारूनच गड पाहायला जायचे. गडावर चढताना आपण प्रतापगडावरच चढत आहोत असा भास होतो.
(2) कडके बिजली तोफ Kadak Bijali Tope
या तोफेत अजूनही गोळा अडकलेला दिसतो. या तोफेची लांबी 5.50 मीटर असून भारतातील दुसरी लांब तोफ आहे .ही तोफ डागली की बिजलीसारखा कडक आवाज यायचा म्हणून या तोफेला कडक बिजली तोफ नाव पडले.गडासमोरील टेकडीवर मंदिराचा आसरा घेऊन इंग्रज लढत होते. मंदिराला नुकसान पोहोचू नये म्हणून तोफ डागायला राणीने मनाई केली होती. आजही तोफेच्या तोंडात तो गाळा आहे. ही तोफ गुलाम घोस खान चालवत होता होता.
3. बारादरी Baradari
महाराज गंगाधर राव ने आपला भाऊ रघुनाथरावासाठी ही बारादरी इमारत बांधली होती. रघुनाथला नृत्य आणि संगीताची आवड होती. येथे नाचगाण्याचा कार्यक्रम होत असे.
(4) दिवाण-ए-खास: Divan-E-khas
राज्य कारभार करणारे मंत्री, कारभारी, कारकून यांच्या कारभारासाठी हा दिवाण-ए-खास वाडा उभारला होता. येथूनच कारभार केला जात असे.
(5) पंच महाल / राणी महाल: Panch Mahal/Rani Mahal
राणी लक्ष्मीबाई साठी बांधलेला हा महाल जमिनीवरुन तीन मजली दिसतो आणि जमिनीखाली दोन मजले आहेत. राणी लक्ष्मीबाई गंगाधर रावच्या मृत्यूनंतर या महालातूनच कारभार पाहात होती .का महालातून बाहेर पडण्यासाठी गुप्त वाट होती.ती तीन किलोमीटर अंतरावर बाहेर पडते.या वाटेला गुप्त गुहा असे म्हणतात. राणीचा पंचमहल (panch Mahal) आजही मजबूत स्थितीत आहे.
6) गौतमी बाई, गुलाम घोस यांची समाधी
गौतमी बाई या झाशीच्या महिला सेनेच्या सेनापती होत्या. त्या तोफ चालवायच्या. खुदाबक्ष हाही लढवय्या होता.गुलाम घोस कडक बिजली तोफ चालवायचा. या तिघांनाही झाशीसाठी लढता लढता वीर गती प्राप्त झाली होती. झाशीच्या राणीने योग्य क्रियाकर्म करून येथे समाधी बांधून घेतल्या होत्या.