द्वारका: Dwarka

महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बु‌द्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ टाकणारा कसबी कारागीर, उत्तम सल्लागार म्हणजे श्रीकृष्ण होय.तो एक माणूस होता त्यालाही वैयक्तिक आणि राजकीय समस्या होत्या. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कृष्णाने Dwarka नगरी बांधली. या Dwarka नगरीच्या इतिहासावर आणि त्या अनुषंगाने कृष्ण चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

द्वारकेची संक्षिप्त माहिती Brief Information of Dwarka:

Dwarka

ठिकाणाचे नाव : द्वारका /Dwarka

ठिकाणाचा प्रकार : सांस्कृतिक

स्थापना : श्रीकृष्ण
स्थापत्य विशारद: विश्वकर्मा

जिल्हा. : द्वारका

राज्य: गुजरात

समुद्र किनारा : अरबी समुद्र

नदी काठ: गोमती

द्वारकेला कसे जायचे? How to go to see Dwaraka?

द्वारकेला रेल्वे स्टेशन आहे. गांधीनगर (गुजरात) येथूने द्वारकेला रेल्वेने जाता येते. गांधीनगर ते द्वारका 472 किलोमीटर अंतर आहे. छत्रपती शिवरायांनी दोन वेळा लुटलेल्या सुरतेहून द्वारकेला जाण्यासाठी 550 किलोमीटर अंतर जावे लागते. राजकोट या गुजरात मधील प्रसिद्ध ठिकाणापासून द्वारका 236 किलोमीटर आहे. येथून बसने किंवा रेल्वेने जाता येते.

द्वारका कोठे आहे ? Where is Dwarka?

Dwarka गुजरात राज्यात आहे. गुजरात राज्यात द्वारका हा एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे. याच जिल्ह्यात गोमती नदीच्या मुखाजवळ अरबी समुद्राच्या किनाल्यावर श्रीकृष्णाने कलियुगाच्या सुरुवातीलाच द्वारका नगरी वसवली होती. ही घटना पाच ते सहा हजार वर्षांंपूर्वी घडलेली असावी. या घटनेचा निश्चित कालावधी सांगता येत नाही.

द्वारका नगरी पाण्याखाली आहे का ? Is the city of Dwarka under sea ?

कृष्णाने बांधलेली द्वारका नगरी समुद्राच्या पाण्याखाली बुडीलेली आहे. असे काही जणांना वाटते; पण ते काही खरे नाही. दहा हजार वर्षात एखादी नगरी पाण्याखाली बुडण्याइतपत समुद्राची पातळी काही वाढलेली नाही. समुद्राकाठची अशी अनेक शहरे पाण्याखाली गेली असती. कृष्णाने द्वारका नगरी बांधली तेथे समुद्रात काही अवशेष सापडतात. ते गोमटी नदीच्या महापुराने वाहून गेल्याची शक्यता असू शकते. किंवा त्सुनामी लाटेत काही अवशेत समुद्रात वाहून गेल्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागला असा काही ठोस पुरावा मिळालेला नाही.

श्रीकृष्णाने द्वारका ही नवीन नगरी का निर्माण केली ? Why did krishna creat new city of Dwarka?

Dwarka temple

श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांची मथुरा ही राजधानी होती. बलराम हा राजा होता. कृष्णाला राज्यपदाची लालसा नव्हती. त्याने प्रचंड बुद्धिमता आणि तर्कशक्तीच्या जोरावर संपूर्ण मात भूमीवर आपली वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली होती. हे सारे खरे असले तरी जराशंध हा बलाढ्य राजा होता. त्याच्याकडे प्रचंड सैन्य होते. याशिवाय कालयवन हाही बलाढ्य राजा होता. या दोन्हीही राजांनी मथुरेवर वारंवार हल्ला करुन मथुरेच्या जनतेला त्रस्त केले होते. त्यामुळे कृष्णाने मथुरेपासून 1231 किमी दूर असलेल्या गोमती नदीच्या मुखाजवळ नवीन नगरी वसवली. ही नगरी वसवण्यासाठी ‘विश्वकर्मा’ या स्थापत्य विशारद‌ने खूप मोठे योगदान दिले होते. इंद्रप्रस्थ बनवण्यासाठी पांडवांना मय या वास्तुविशार‌ची मदत झाली होती. मय (माया) आणि विश्वकर्मा हे तत्कालीन खूप मोठे वास्तुविशारद होते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी/ krishna janmashtami

द्वारका नगरीचे संशोधन. Research of Dwarka:

द्वारका नगरीचे भारतीय पुरातत्त्व विभागाने संशोधन करणाचा प्रयन केला आहे.पण काही ठोस पुरावा हाती लागला नाही.तरी सुद्धा या ठिकाणी काही अवशेष सापडले आहेत. श्रीकृष्णाने गोमती नदीच्या मुखाजवळ द्वारका नगरी निर्माण केली, याचे अनेक पुरावे प्राचीन ग्रंथात आहेत.कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव यांचे युद्ध झाले. त्यावेळी श्रीकृष्ण द्वारकेहून कुरुक्षेत्राकडे आला होता. आणि अर्जुन, दुर्योधन अपल्याला युद्धात मदत मिळावी म्हणून द्वारकेलाच गेले होते, त्यावेळी कृष्णाने दोघांच्यापुढे दोन पर्याय ठेवले होते. पहिला पर्याय आपण स्वतः आणि दुसरा पर्याय द्वारकेचे सैन्य अर्जुनाने कृष्ण स्वीकारला.दुर्योधनाने सैन्य स्वीकारले. या प्रमाणे कृष्ण युद्धाच्या वेळी शस्त्र न घेता पांडवांच्या बाजूने अर्जुनाचा सारथी म्हणून उभा राहिला आणि पांडवानी विजय मिळवून दिला.

द्वारका नगरी नष्ट कशी व का झाली? हा प्रश्न सर्वांनाच नेहमी पडतो. एक तर पाच हजार वर्षापूर्वीची एकही वास्तू आता अस्तित्वात नाही. त्यामुळे द्वारकेचे अस्तित्व गृहीत धरणे चुकीचे आहे. दुसरी बाब अशी की द्वारका नगरी समुद्र काठावर वसलेली होती. त्यामुळे एखादी त्सुनामी आलेली असेल, तर त्या त्सुनामीत ही नगरी नष्ट झालेली असेल. आणखी एक शक्यता अशी की ही नगरी गोमती नदीच्या काठांवर वसलेली होती. त्यामुळे या नदीने कधी तरी आपले पात्र बदलले असेल आपण ही नगरी त्या नदीच्या पात्रातून वाहून केली असेल, अशीही शक्यता आहे.

द्वारकेतील प्रसिद्‌ध ठिकाणे : Famous Places of Dwarka

1) द्वारकाधीश मंदिर: Dwarkadhish Temple:

Dwarkadhish Temple

द्वारकेतील हे प्रसिद्ध सुंदर मंदिर कृष्ण भक्त गोकुळदास पारीख याने 1814 मध्ये बांधले आहेत. या द्वारकादासने मथुरा-वृंदावन येथेही मंदिर बांधले आहे. श्री कृष्णाने या ठिकाणी द्वारका नगरी वसवली. तेव्हापासून कृष्णाला द्वारकाधीश’ ही नवी उपाधी मिळाली, याच नावाने गोपालदासने द्वारकाधीश मंदिर बांधले. या मंदिरात गोकुळअष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. द्वारकाधीश मंदिर एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात चांदीच्या सिंहासनावर कृष्ण विराजमान आहे या मंदिरात रुक्मिणी, राधा, अन्य देवतांच्या मूर्ती सु‌द्धा आहेत.

(2) रुक्मिणी मंदिर; Rukmini Mandir, Dwarka.

Rukmini Mandir, Dwarka.

द्वारकेमध्ये असलेले रुक्मिणी मंदिर खूप प्राचीन आहे .इतर मंदिरांच्या तुलनेने हे रुक्मिणी मंदिर नगराच्या थोडे बाहेर आहे. द्वारकेपासून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. रुक्मिणी ही कृष्णाची पट्टराणी होती. कृष्णाने रुक्मिणीला तिच्या इच्छेनुसार आणली होती. रुक्मिणी, कृष्ण आणि दुर्वास ऋषी यांच्या बाबतीत जी कथा सांगितली जाते , ती कपोलकल्पित आहे. हे मंदिर खूप सुंदर आहेच. त्याच बरोबर मंदिरातील रुक्मिणीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. द्वारकेपासून 2 किलोमीटर दूर असलेले हे रुक्मिणी मंदिर पाहायला आवश्य जावे.

3) द्वारका घाट: Dwarka Ghat

Dwarka Ghat

द्वारकेत आल्यानंतर सायंकाळी भेट घेण्यासारखे ठिकाण म्हणजे द्वारका घाट होय. द्वारका नगरी समुद्र काठालाच वसलेली आहे. त्यामुळे सायंकाळचे सुमुद्रकाठचे विलोभनीय दृश्य पाह‌ण्यासाठी आवश्य यायला हरकत नाही. लांबलचक असलेल्या या घाटावरून फेरफटका मारायला खूप मजा येते. सायंकाळी सुटणारा खारा वारा मन प्रसन्न करतो. उसळत्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेता येतो.

(4) कैलास कुंड: Kailas kund Dwarka:

द्वारकेत असणाऱ्या पाच महत्त्वाच्या कुंडांपैकी हा कैलास कुंड आहे. चक्रतीर्थ पाहून कैलास कुंड पाहायला जाता येते. या मंदिराच्या पुढे गेल्यावर सूर्य नारायण मंदिर आहे. या कैलास कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुंडातील पाणी गुलाबी रंगाचे आहे.

कृष्णाला रणछोडदास असे का म्हटले जाते ? Why Krishna is called Ranachhodadas?

कृष्णाच्या आयुष्यात दोन अशा घटना घडल्या की यापुढे आहेत—-

कृष्णाला रणछोडदास असे म्हटले जाऊ लागले.. रुक्मिणी ही विद‌र्भातील भीष्मक राजाची राजकन्या होय. तिचा भाऊ रुक्मी हा महत्वाकांक्षी होता.त्याचे राज्य जराशंधाच्या राज्याचा एक हिस्सा होता.त्याचा कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या लग्नाला विरोध होता .म्हणून कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेऊन प्रेम विवाह केला. यावेळी रुक्मीने कृष्णाशी युद्ध पुकारले होते, परंतु आपल्याच पत्नीच्या भावाशी युद्ध करायला कृष्णाला योग्य वाटले नाही.म्हणून कृष्ण रूक्मिणीला घेऊन पळून गेला.

दुसरे कारण म्हणजे जराशंधाशी वारंवार युद्ध करण्यापेक्षा मथुरा सोडून कृष्ण गुजरातला आला आणि तेथे द्वारका नगरी वसवली.

जरासंधाने कृष्ण आपल्याला घाबरून पळून गेला अशी वावडी उठवली. यामुळे .कृष्णाला सगळे रणछोडदास म्हणू लागले.पुढे कृष्णाने भीमाकरवी जराशंधाचा वध केला.

चार धाम Chardham

भारतातील चार धाम प्रसिद्ध आहेत.ती पुढीलप्रमाणे——–

.1.बद्रीनाथ (उत्तराखंड)
.2.द्वारका ( गुजरात).
.3.रामेश्वरम् (तामिळनाडू )
.4.जगन्नाथ पुरी (उडीसा)

या चारधाम मध्ये द्वारकेचा समावेश असल्यामुळे द्वारकेला वेगळे महत्त्व आहे.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्‌ध ठिकाणे: kolhapur places to visit
  2. अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag
  3. श्रीकृष्ण जन्माष्टमी/ krishna janmashtami

Leave a comment