Six Seasons : सहा ऋतू

भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बद‌लांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बद‌लानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया—

ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons

1) वसंत – फाल्गुन कृष्ण प्रतिपदा ते वैशाख शुद्ध पौर्णिमा.

२) ग्रीष्म- वैशाख कृष्ण प्रतिपदा ते आषाढ शुद्ध पौर्णिमा.

3) वर्षा- आषाढ कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पौर्णिमा.

4) शरद – भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा

5) हेमंत ऋतू– कार्तिक कृष्ण प्रतिपदा ते पौष शुद्ध पौर्णिमा,

6) शिशिर ऋतू- पौष कृष्ण प्रतिपदा ते फाल्गुन शुद्ध पौणिमा.

वरील प्रमाणे भारतीय चांद्र-सूर्य वर्षातील महिने आणि सहा ऋतू कसे येतात, हे सांगितले आहे. आता आपण या सहा ऋतूत कोणकोणते सण येतात? त्या सहा प्रऋतूंची वैशिष्ट्ये काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती घेऊया.—

1) वसंत ऋतू : Spring

वसंत ऋतू हा फाल्गुन कृष्ण प्रतिपदे‌ला सुरु होतो आणि वैशाख शुद्ध पौर्णिमेला संपतो. वसंत ऋतूत रंगपंचमी (वसंत पंचमी), गुढी पाडवा, चैत्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, महात्मा फुले जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, संत बसवेश्वर जयंती, गौतम बुद्ध जयंती, अक्षय्य तृतीया इत्यादी महत्त्वाचे सण व उत्सव येतात.

वसंत ऋतू हा सर्वांत सुखद, आल्हाद‌दायक आणि आनंद‌दायी असतो. या महिन्यात थंडी कमी होते. नैर्ऋत्येकडून थंडगार वारे येतात. ते खूप आल्हाद‌दायक असतात. म्हणून या ऋतूला ऋतूराज वसंत किंवा ऋतूंचा राजा असे म्हणतात.यावेळी शिशिर ऋतू संपलेला असतो. पानगळती थांबलेली असते. थंडगार नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे झाडांना नवीन पालवी येते.फुले येतात. फळे बहरतात.निसर्ग रंगीबेरंगी दिसू लागतो. निसर्गात अनेक रंगांची उधळण झालेली असते .या रंगांची उधळण पाहूनच माणूसही या निसर्गातील बदलाचा आनंदाने स्वागत करण्यासाठी रंगपंचमी हा सण (होळी) साजरा करतो. वसंतोत्सवाचा आरंभ फाल्गुन कृष्ण प्रतिपदे‌ला होतो; तर या उत्सवाचा शेवट वैशाख शुद्ध पौर्णिमेला होतो.

2) ग्रीष्म ऋतू. Summer:

ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. या ऋतूत भारतात सर्वत्र उन्हाळा असतो. या ऋतूतील कडक उन्हामुळे लोक हैराण होतात .तापमान अधिक वाढते. तर लोकांना उष्माघात होतो. त्यामुळे या ऋतूत विशेष काळजी घ्यावी लागते.

ग्रीष्म ऋतूचा आरंभ वैशाख कृष्ण प्रतिपदे‌ला होतो आणि हा ऋतू आषाढ शुद्ध पौर्णिमेला संपतो. या ऋतूत छत्रपती संभाजी महाराज जयंती, महाराणा प्रताप जयंती, शिवराज्याभिषेक दिन मृग नक्षत्र (मृगाचा सण), आषाढी एकादशी गुरु पौर्णिमा इत्यादी महत्त्वाचे सण येतात.

२१ मार्च पासून सूर्याचे विषुववृत्ताकडे उत्तरायण सुरू होते. 23 जूनला सूर्य कर्क वृत्तावर असतो.कर्कवृत्त भारतातून जाते. त्यामुळे सूर्याची किरणे सरळ पडतात.त्यामुळे भारतात या काळात प्रचंड उष्णता असते. म्हणूनच या तापमान वाढीच्या काळाला ग्रीष्म ऋतू म्ह‌णतात. ग्रीष्म ऋतूचे फायदे ही आहेत. या काळात पिकांची वाढ झटपट होते. हवेतील घातक जीवजंतू मरतात. उष्णतेमुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेच पुढे पावसाळा ऋतू सुरु होतो. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता वाढून कधी कधी वळवाचा पाऊस पडतो. कधी-कधी गारांचा पाऊस पडतो.

3) वर्षा ऋतू : Rainy Season:

ग्रीष्म ऋतू नंतर येणारा ऋतू म्हणजे वर्षा ऋतू होय. वर्षा म्हणजेच पाऊस. वर्षा ऋतू म्हणजे पावसाचा ऋतू होय .वर्षा ऋतू हा आषाढ कृष्ण प्रतिपदेला सुरु होतो. आणि तो भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला संपतो
भारतात चार महिने पाऊस पडतो. ऋतुमानाप्रमाणेच पाऊस पडेलच असे नाही. जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदलत्या स्वरुपानुसार ऋतुचक्र सुद्धा पद्धत चालले आहे.

वर्षा ऋतू निसर्गाला नवसंजीवनी देतो. निसर्ग हिरवेगार होतो. पिके वाढतात. शेतकरी आपल्या शेतात वर्षा ऋतूमुळे पिके घेतो. नद्या भरुन वाहतात. तलाव तुडूंब भरतात.
उन्हाळ्यात लागणारे पाणी वर्षा ऋतूमुळेच मिळते. वर्षा ऋतूमुळे पाणी मिळते. म्हणजे जीवन मिळते

4) शरद ऋतू : Autumn

पावसाळ्याचा ओघ कमी झाल्यानंतर शरद ऋतूला प्रारंभ होतो. शरद ऋतूचा प्रारंभ भाद्रपद कृष्ण प्रतिपदे‌ला होतो. तर कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शरद ऋतू समाप्त होतो.

शरद ऋतूत विजयादशमी हा महत्त्वाचा सण येतो. हा सण दहा दिवसांचा असतो. या ऋतूत दीपावली हा मोठा सण येतो. याच शरद ऋतूत दोन मोठे सण येतात. तसेच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा याच ऋतूत साजरी करतात. शरद‌ाचे चांद‌णे प्रसिद्ध आहे. लोक चांद‌णे भोजन आयोजित करतात आणि कोजागिरी पौर्णिमेचा, शरदातील चांद‌ण्याचा आनंद लुटतात.

शरद ऋतून पूर्वेकडून वारे वाहू लागतात. पाऊस कमी झालेला असतो. आकाशात पांढ‌ऱ्या पुंजक्यांचे ढग दिसू लागतात. खरीप पिके काढणीला येतात. रब्बी पिकांच्या पेरणीची धांदल उडालेली असते. हळूहळू आकाश निरभ्र दिसते. शरद ऋतूत सुद्धा वातावरणातील तापमान वाढते. याला ऑक्टोबर हिट (October heat) म्हणतात. ऑक्टोबर हिट रब्बी हंगामासाठी पोषक असते. बियाणांचे उगवण चांगले होते.

(5)-हेमंत ऋतू – Winter:

कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करून शरद ऋतूची सांगता होते. त्यानंतर कार्तिक कृष्ण प्रतिपदेला हेमंत ऋतू सुरु होतो.या ऋतूत भारतात थंडी असते. काही ठिकाणी गुलाबी थंडी असते, तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी असते. या ऋतूत चांगली भूक लागते. जठराग्नी पेट‌लेला असतो. पचनशक्ती सुधारते.वाढते. चांगली भूक लागते. शरीराला अधिक ऊर्जेची गरज भासते.हिवाळ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ अधिक खावे लागतात.

हेमंत ऋतूत देव दीपावली (धाकटी दिवाळी) येते. कोकणात काही ठिकाणी देव दीपावली साजरी करतात. याच ऋतूत नाताळ हा ख्रिश्चनांचा सण येतो.लोक ख्रिसमस साजरा करतात.

हेमंत ऋतुत्तच दत्तात्रेय जयंती येते. बळीवंश परंपरेचा वारसदार म्हणून दत्तात्रेयाकडे पाहिले जाते. दत्तात्रेय जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतात. मकर संक्रात हा महत्त्वाचा सण सुद्धा हेमंत ऋतूतच येतो. मकर संक्रांतीला तीळगूळ वाटतात. पतंग उडवतात, नाताळ सणातही पतंग उडवतात. 22 डिसेंबरला सूर्य मकर‌वृत्तावर असतो. त्यामुळे हेमंत ऋतूत भारतात थंडी असते.त्या दिवसापासून म्हणजे 22 डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. म्हणून त्याच्या स्वागतासाठी मकर संक्रातीला तीळगुळ वाटून आनंदोत्सव साजरा करतात. पौष शुद्ध पौर्णिमेला हेमंत ऋतू समाप्त होतो.

(6) शिशिर ऋतू: Cold Season:

 

शिशिर ऋतू पौष कृष्ण प्रतिपदेला सुरु होतो आणि फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला समाप्त होतो. वर्षातील हा शेवटचा ऋतू मानला जातो. हेमंत ऋतूच्या मध्यातून थंडीला सुरुवात होते. शिशिर ऋतूतही कडाक्याची थंडी असते. काही ठिकाणी कडाक्याची थंडी असते.तर काही ठिकाणी गुलाबी थंडी असते. शिशिर ऋतू हा थंडीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.

शिशिर ऋतूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ऋतूत झाडांची पानगळती मोठ्या प्रमाणात होते. सावरीसारखे झाड, किंवा पांढऱ्या चाफ्यासारखे झाड पूर्णतः पर्णहीन होते. इतर अनेक झाडांची पाने थंडीच्या परिणामामुळे गळून पडतात. पुन्हा वसंत ऋतूत झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते.

शिशिर म्हणजेच हिम. थंड .थंडीचा मोसम असा अर्थ होतो.

Leave a comment