कोल्हापूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संघर्षमय लढत म्हणून कागलची लढत ओळखली जाते. माजी मंत्री, माजी खासदार सदाशिवराव मंडलीक यांचे पुत्र माजी खासदार संजय मंडलीक, विद्यमान आमदार मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे पुत्र समरजित घाटगे आणि संजयबाबा घाटगे अशा चार नेत्यांचे गावागावात गट असलेला तालुका म्हणजे कागल तालुका होय. हे चार नेते वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेवर आहेत. हसन मुश्रिफ, समरजित घाटगे, संजय मंडलीक यांच्याकडे स्थायी सत्ता असलेले कारखाने आहेत . तर संजय बाबा गटाकडे दीर्घ काळ पंचायत समिती ताब्यात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या चार तुल्यबळ गटांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता गट हे ठरवणे तसे गुंतागुंतीचे आहे. तरी सुद्धा 2024 च्या निवडणुकीत महायुती तर्फे हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाली आहे, तर महाविकास आघाडीतर्फ समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात काट्याची लढाई आहे. या लढाईचा निकाल काय लागेल? याचा अंदाज बांधण्याचा आपण प्रयत्न करुया . तसेच त्यापूर्वीच्या मागील इतिहासाचे सिंहावलोकन करुया.
1985 ची लक्षवेधी लढत :
सदाशिवराव मंडलीक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे :The Highlight fight of 1985: Mandlik Versus Ghatge:
कागल मतदार संघातील 1985 ची विधानसभा निवडणूक खूपच गाजली. सदाशिवराव मंडलीक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यात टोकाची लढत झाली.या निवडणुकीत गावागावात ईर्षा निर्माण झाली होती. अनेक गातांत कार्यकार्याची डोकी फुटली होती. सदाशिवराव मंडलीक यांनी या निवडणूकीला राजा विरूद्ध प्रजा असा रंग दिल्यामुळे प्रचंड संघर्षांत सदाशिवराव मंडलीक यांनी विजय मिळवून कागलच्या राजकारणाला कलाटणी दिली. या निवडणुकीनंतर मंडलिकांनी मागे वळून पाहिलेच नाही. ते पुढे मंत्री झाले. खासदार झाले.1989,1994 या निवडणूकीत आमदार मंडलिक यांचाच विजय झाला. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक 1999 सालच्या खासदारकीच्या निवडणूकीत विजयी झाले.
हसन मुश्रीफ यांचा उदय: Mushrif’s rise in kagal:
सदाशिवराव मंडलिक यांनी आमदार म्हणून निवडून आल्यावर आमदारकीचा राजीनामा दिला. 1999 साली खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आपला शिष्य हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे केले. त्यावेळी संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात लढाई झाली. या लढाईत हसन मुश्रीफ यांचा 2000 मतांनी पराभव झाला . सलामीच्याच समान हसन मुश्रीफ यांचा पराभव झाला असला तरी आठ-नऊ महिन्यांनी विधानसभा निवडणूक लागली. या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही 2004, 2009, 2014, 2019 सालच्या सर्व निवडणुका मुश्रीफांनी जिंकल्या. प्रतिस्पर्धी कोणीही असो . कागलची निवडणूक हसन मुश्रीफच जिंकणार. असी स्थिती निर्माण झाली होती. मुश्रीफांनी तालुक्यात केलेल्या प्रचंड कामामुळे त्यांना विजय मिळत गेला मंत्रिपदे चालून आली.
2024 ची विधानसभा निवडणूक कागल: Election of 2024: Kagal Assembly
हसन मुश्रिफ यांनी नोव्हेंबर 2024 पूर्वी सलग पाच पंचवार्षिक निवडणूक जिंकली असली तरी 2024 च्या निवडणुकीपूर्वी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अजित पवार यांचा 40 आमदारांचा एक गट शिंदे- फडणवीस गटाला मिळाला. त्यात हसन मुश्रीफ सुद्धा आहेत. भाजपा+ फुटीर शिवसेना + फुटीर राष्ट्रवादी यांची सत्ता असताना ही निवडणूक लागली आहे.
शरद पवार यांनी सर्व काही (मंत्रिपदे) दिले असताना इडीच्या धमकावणीपुढे हसन मुश्रीफ यांनी नांगी टाकली आणि भाजपाने टाकलेल्या दडपणाला ते बळी पडले. एप्रिल 2024 खासदारकीच्या निवडणुकीत संजय मंडलीक रिंगणात होते. त्यांना कागलमध्ये पुरेसे मतदान मिळाले नाही. त्यामुळे वीरेंद्र मंडलीक हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. संजय बाबा घाटगे, संजयसिह मंडलीक या दोन तुल्यबळ गटाचा पाठिंबा घेऊन हसन मुश्रीफ युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असले तरी शरद पवार यांनी समरजित घाटगे यांना पक्षाच्या तिकीटावर उभे केले आहे. समरजित घाटगे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. इकडे प्रचंड पाठिंबा अजूनही मुश्रीफ गटांतही अंतर्गत नाराजी आहे. संजय बाबा घाटगे प्रत्येक सभेला एकत्र असतात. पण त्यांच्या कार्यकत्यांमध्ये निरुत्साह आहे. वीरेंद्र मंडलीक तर प्रचंड नाराज आहेत. या सर्व बाबींचा हसन मुश्रीफ यांना फटका बसला तर समरजित घाटगे विधानसभेला बाजी मारण्याची शक्यता आहे. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.