महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर 2024 या एकाच दिवशी विधानसभेची निवडणूक होत आहे. एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक होणे, असे प्रथमच होत आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने [Election Commission] 20 November ही निवडणूक तारीख ठरवली असली तरी त्याचा संपूर्ण ताण प्रशासन यंत्रणेवर येत असतो. सुरक्षा यंत्रणा, नियोजन यंत्रणा, प्रशिक्षण यंत्रणा यांच्यावर निवडणुकीचा ताण येत असतो. तरी सुद्धा महाराष्ट्रातील निवडणूक ही पारदर्शक व्हावी हीच अपेक्षा आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीः Mahavikas Aaghadi versus Mahayuti:
महाराष्ट्रात अनेक छोटे-मोठे पक्ष असले तरी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच थेट लढत होणार आहे. तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व असूनही 2024 च्या निवडणुकीत त्यांचे स्थान नगण्य असणार आहे. असेच सध्या चित्र निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रमुख पक्षांची आघाडी झाली आहे. तर भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यां सत्ताधारी पक्षांनी महायुती स्थापन केली आहे. महाराष्ट्रात सरळ लढत या दोनच आघाड्यात होणार असून त्यांच्यातच अटीतटीच्या लढती होणार आहेत.
तिसरी आघाडी-Tisari Aaghadi:
तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, इम्तियाज जलील यांचा एम. आय. एम. पक्ष, युवराज संभाजीराजे यांचा स्वराज पक्ष एकत्रित येण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. राजू शेट्टी यांची शेतकरी संघटनेने ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतली आहे. तिसऱ्या आघाडीतील काही नेत्यांच्या प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि जागा वाटपात अव्वा च्या सव्वा मागणी यामुळे त्यांची कुणाशीच युती किंवा आघाडी होत नाही, हे तिसऱ्या आघाडी चे वैशिष्ट्य आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यांना महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, असे सर्वसामान्य जनतेची मागणी झाली आहे. सरसकट मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्या. या त्यांच्या दुसऱ्या मागणीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. OBC संघटना जाग्या झाल्या, दोन्ही बाजूकडील लोक परस्पर आरोप-प्रत्यारोपात गुंतले आणि आरक्षणाचा मुद्दा मागे पडला. OBC मधून आरक्षण मिळण्यास कायदेशीर अनेक अडचणी आहेत. 2024 च्या निवडणुकीत मराठा उमेदवार महायुतीत, महाआघाडीत आहेत. त्यामुळे मराठा मतविभागणी अटळ आहे. साहजिकच मनोज जरांगे पॅटर्न या निवडणुकीत थोडा क्षीण झाल्याचे जाणवत आहे.
महायुती: MahaYuti
भाजपा + शिंदेगट + अजित पवार गट यांची महायुती सत्तेवर आहे. या महायुतीत सर्वाधिक जागा भाजपा लढवत आहे. 148 पेक्षा जास्त जागा भाजपा लढवत आहे. तर 65 पेक्षा जास्त जागा शिंदेगट लढवत आहे. अजित पवार गट 50 पेक्षा जास्त जागा लढवत आहे. भाजपने महायुतीत शिंदे आणि अजित पवारगट यांची चांगलीच कोंडी केली आहे. मुख्यमंत्री आपलाच कसा होईल, या दृष्टीने वाटचाल चालू केली आहे. महायुतीची राज्यात सत्ता आली तर शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपाच्या वळचणीला असतील.राज ठाकरे यांचे 2024 ला भाजपाचे मुख्यमंत्री असेल , हे विधान खूप सूचक आहे.
लोकसभेला प्रचंड अपयश आल्याने महायुती आता सावध झाली आहे. युतीने मध्यप्रदेश सरकारची लाडली बहीण योजना महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ या नावाने सुरु केली आहे. त्यामुळे लोकसभेला असलेले वातावरण विधानसभेला राहिलेले नाही. लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रात रान उठवलेले आहे. कोरोना काळात तुंबलेला (साठलेला) फंड महायुतीने बाहेर काढलेला आहे. युतीच्या आमदारांना प्रचंड निधी पुरवला आहे. त्यामुळे युतीच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास कामे दिसत आहेत. लाकडी बहीण योजना आणि विकास कामे या दोन मुद्द्यांवर महायुती निवडणूक लढवत आहे. या दोन बाबींमुळेच त्यांच्या बाजूने लोकांचा कल वाढत आहे.
महाविकास आघाडी. Mahavikas Aaghadi.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला एप्रिल 2024. मध्ये झालेल्या निवडणुकीत भरघोस यश मिळाले. यामुळे जागावाटपात काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. काँग्रेस पक्ष 100 पेक्षा जास्त जागा लढवत आहे, तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट 90 च्या दरम्यान जागा लढवत आहेत. उद्धव ठाकरे गटाने मागणी करूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावर चर्चा केलेली नाही. हे आघाडीच्या दृष्टीने योग्यच आहे. असे म्हणावे लागेल.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी झाले आहे. हे असेच चालू राहिले तर सरकार दिवाळखोरीत जाईल असे महाआघाडीचे मत आहे. विकास कामाच्या नावाखाली महायुतीच्या आमदारांनी प्रचंड भष्टाचार केला आहे. असाही आघाडीचा आरोप आहे, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांकडे युतीचे दुर्लक्ष आहे. युतीच्या काळात अनेक कंपन्या गुजरातला गेल्या आहेत. बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. स्पर्धा परीक्षांत (MPSC) गलथानपणा जाणवला, महागाई वाढली. कांदा, कपाशीला योग्य दर मिळाला नाही. मंदिरे चकचकीत झालीत; पण जिल्हा परिषद शाळांवर खापऱ्या नाहीत. अशी अवस्था आहे. अशा अनेक मुद्द्यांवर महाआघाडी निवडणूक लढवत आहे. पुरोगामी विचाराच्या चळवळींचा महाआघाडीला पाठिंबा आहे.
दोन्ही आघाड्या आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा करत आहेत. पक्षाशी गद्दारी करणे, पक्षच पळवून नेणे .हे मुद्दे मागे पडले आहेत. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करायचा, ED ची भीती दाखवायची आणि मग सत्तेत सामील करून घ्यायचे .हाही मुद्दा मागे पडला आहे. सरकारवर कर्जाचा डोंगर आहे, याची कुणालाच काळजी नाही. आरोपाची पातळी घसरली आहे. बदनामीची सीमा ओलांडली आहे. स्थानिक मतदार संघातील संपर्क, प्रश्न, विकास कामे, दर्जाहीन कामे, टक्केवारीची कामे, ठेकेदारी, मक्तेदारी या मुद्यांवर सध्या निवडणूक लढवली जात आहे. बघूया कोण बाजी मारते ते. महायुती की महाविकास आघाडी? तुम्हाला काय वाटते? Comment Box मध्ये नक्कीच Comment देऊन आपले मत कळवा.
छान विश्लेषण