साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सेल्मा लागेरलोफ
Selma Lagerlof
जन्म : 20 नोव्हेंबर 1858
मृत्यू : 16 मार्च 1940
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1909
सेल्मा लागरलोफ ह्या सुप्रसिद्ध कादंबरीकार होत्या. त्यांचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. त्यांच्या साहित्यात आध्यात्मिक विचार, आदर्शवत कल्पना, सौंदर्यसृष्टी इत्यादी बाबी आढळून येत होत्या. त्यांना 1909 साली साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाल्यावर स्वीडनच्या सम्राटाने एक मेजवानी देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांना त्यांच्या वडिलांनी साहित्यिक लेखन करण्यास प्रोत्साहन दिले. त्याबद्दल त्या नेहमीच वडिलांची कृतज्ञता व्यक्त करत असत. सेल्मा यांना सहा भाषांचे ज्ञान होते.