Assembly Election-2024- कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. महाडिक-लाटकर नाराज ? कोण जिंकणार ही लढाई.

20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक संपन्न होत असल्याने राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. एके काळी माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची ओळख आहे. सध्या या मतदार संघावर सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे वर्चस्व असले तरी राजेश क्षीरसागर, महाडिक यांचाही ठसा या मतदार संघावर आहे. काँग्रेसने राजेश लाटकर या निष्ठावंत सामान्य कार्यकर्त्याला उमेद‌वारी दिली होती, पण काही नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन राजेश लाटकर यांना तीव्र विरोध केला. त्यामुळे मधुरिमाराजे या सर्वसामान्य उमेद‌वाराला काँग्रेसचे तिकीट देण्यात आले.तर शिंदे गटाने राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे कृष्णराज महाडिकांचा पत्ता कट झाला. आता राजेश क्षीरसागर आणि मधुरिमाराजे यांच्यातच काट्याची लढत आहे. काय होईल या निवडणुकीत? कोण बाजी मारणार? पाहूया सविस्तर-

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ: Kolhapur North Assembly Constituency

2008 च्या मतदारसंघ रचनेनुसार कोल्हापूर उत्तर हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालोजीराजे (काँग्रेस) आणि राजेश क्षीरसागर (शिवसेना) यांच्यात सरळ लढत झाली. सौम्य स्वभाव हे मालोजीराजे यांचे वैशिष्ट्य ; तर आक्रमकता हे राजेश क्षीरसागर यांचे वैशिष्ट्य.राजेश क्षीरसागर यांनी वाढवलेला मतदार संघातील जनसंपर्क त्यांच्या पथ्यावर पडला . साडे पाच हजार मतांनी राजेश क्षीरसागर यांचा निसटता विजय झाला. मालोजीराजे यांना अपक्षांना मिळालेल्या मतांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत Maharashtra Assembly Election-2014] शिवसेनेने पुन्हा राजेश क्षीरसागर यांना तिकीट दिले. तर काँग्रेसने सत्यजित कदम यांना उमेद‌वारी दिली .भारतीय जनता पक्षाने महेश जाधव यांना उमेद‌वारी दिली; तर राष्ट्रवादी काँग्रेसने रावसाहेब पोवार यांना तिकीट दिले. या चौरंगी लढतीचा निकाल पुढील प्रमाणे लागला –

उमे‌द्वार

1.राजेश क्षीरसागर(शिवसेना)यांना 69,736 मते मिळालीत.

2.सत्यजित कदम(काँग्रेस) यांना 47,315 मते मिळालीत.

3.महेश जाधव(भाजपा) यांना 40,104 मते मिळालीत.

4.रावसाहेब पोवार(राष्ट्रवादी) यांना 9,887 मते मिळालीत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी मतदार संघातील जनसंपर्काच्या जोरावर चौरंगी लढतीत एकतर्फी 22000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

कोल्हापूर उत्तर: 2019 ची निवडणूक – Kolhapur North Election-2019.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली. युतीने विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना) यांना तिकीट दिले, तर आघाडीने चंद्रकांत जाधव यांना तिकीट दिले.

चंद्रकांत जाधव यांच्यासाठी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कंबर कसली होती. त्याचा फायदा चंद्रकांत जाधव यांना झाला. राजेश क्षीरसागर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

चंद्रकांत जाधव (काँग्रेस) यांना 91053 मते मिळाली, तर राजेश क्षीरसागर यांना 75,854 मते मिळाली, सुमारे 15000 पेक्षा जास्त मतांनी चंद्रकांत जाधव यांनी विजय प्राप्त केला. राजेश क्षीरसागर यांची हॅटट्रिक मात्र झाली नाही. चंद्रकांत जाधव यांना अल्पकाळच आमदारकी मिळाली. त्यांच्या आकस्मिक निधनाने 2022 साली कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोट निवडणुक लागली.

कोल्हापूर उत्तर 2022 ची पोट निवडणूक – Kolhapur North By-Election-2022:

आमदार चंद्रकांत आधव यांच्या आकस्मिक निधनाने April 2022 मध्ये कोल्हापूरची पोट निवड‌णूक लागली. या निवड‌णुकीत काँग्रेसने म्हणजे सतेज पाटील यांनी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीने काँग्रेसचे माजी उमेदवार (2019) सत्यजित कद‌मांना उमेद‌वारी दिली.भाजपाने सर्व शक्ती पणाला लावून सत्यजित कदम यांना ताकद दिली, पण बंटी पाटील यांच्या समर्थ साथीने आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आकस्मिक निधनाने मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेचाही जयश्री जाधव यांना फायदा झाला. जयश्री जाधव यांना 97000 मते मिळाली, तर सत्यजित कदम यांना 77800 मते मिळाली. सुमारे 19000 मतांनी जयश्री जाधव यांचा विजय झाला होता.

पाटील यांनी तिकीट मिळवून दिले, पण काही नगरसेवकांनी तिकीट बद‌लाचा उठाव केल्याने सतेज पाटील अडचणीत आले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून इच्छा नसतानाही मधुरिमाराजे भोसले यांना तिकीट देणे भाग पडले . मधुरिमाराजे या सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहेत.
जनमाणसात त्यांच्याबद्दल ‌ चांगली प्रतिमा आहे. खानविलकर घराण्याची कन्या असल्याने राजकीय वारसा आहे. जनतेत मिसळण्याची कला आहे. त्या सुखभावी आहेत.

दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाने राजेश क्षीरसागर यांना उमेद‌वारी दिली आहे. 2022 च्या मुख्यमंत्री बदलाच्या घडामोडीत राजेश क्षीरसागर होते. एक माजी आमदार म्हणून ते सक्रिय झाले होते. धनंजय महाडिक आपला पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांना यश आले नाही. महाडिक गट अर्थात भाजपा राजेश क्षीरसागर यांना मनापासून सहकार्य करणार असल्याचे बोलले जाते. राजेश लाटकर यांची समजूत काढण्यात सतेज पाटील अयशस्वी उरल्यास मधुरिमाराजे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला धोका दिल्याची भावना उद्धव ठाकरे शिवसेनेत आहे. याचा फटका राजेश क्षीरसागर यांना बसण्याची शक्यता आहे. घोडा मैदान जवळ आले आहे. बघूया कोण बाजी मारतंय ते. आपणास काय वाटते. Comment box मध्ये आप‌ले मत जरूर नोंद‌वावे.

Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?

Leave a comment