Assembly Election-2024: कोल्हापूर उत्तर मतदारसंघ, मधुरिमाराजे यांची लढण्यापूर्वीच माघार ! काय होणार पुढे?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाराष्ट्रात कुठेच घडले नाही असे माघारीचे नाट्य घडले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेस पक्षाचा AB form मिळाला असल्याने अचानक शेवटच्या अर्ध्या तासात त्यांनी माघारी घेऊन रिंगणातून बाहेर गेल्या. या घटनेमुळे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या वेगाने दौडणाऱ्या घोड्याला ब्रेक लागला. सुरुवातीला राजू लाटकर यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले होते; पण महानगर- पालिकेच्या नगरसेवकांच्या मोठ्या गटाचा प्रचंड विरोध झाल्याने उमेद‌वारी बदलाचे वारे वाहू लागले. त्यावेळी मधुरिमाराजे स्वतःहून उमेद‌वारीसाठी तयार झाल्या.
मध्यम मार्ग म्हणून बंटी पाटील यांनी मधुरिमारराजे यांना तिकीट मिळवून दिले. आपल्याला विश्वासात न घेता उमेदवारी बद‌लली म्हणून राजू लाटकर यांनी अपक्ष फॉर्म भरला.

सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी अखेरच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी शाहूराजे छत्रपती आणि मालोजीराजे यांच्या सांगण्यावरुन अर्ज माघारी घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. ही घटना बंटी पाटील यांच्या उपस्थितीतच घडली; पण त्यांना छत्रपतींना माघारीच्या निर्णयापासून परावृत्त करता आले नाही. शाहू छत्रपती हे विद्यमान खासदार आहेत. ते काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्याकडून अशा प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे बंटी पाटील यानांच नव्हे,. तर संपूर्ण काँग्रेसलाच तोंडघशी पाडले आहे. मधुरिमाराजे यांना काय वाटते? याचा विचारच झालेला दिसत नाही. त्यामुळे भविष्यात कोणता पक्ष छत्रपती घराण्याला उमदवारीसाठी गळ घालेल असे वाटत नाही.

माघारीनंतर बंटी पाटील यांचा तोल गेला. दम नव्हता तर उमेदवारी घ्यायचीच कशाला ? असे ते बोलून गेले. कार्यकर्त्यांसमोर त्यांना अश्रू आवरता आले नाही.

कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसचा उमेद‌वारच नसल्यामुळे आघाडीसाठी हा मोठाच गुंता झाला आहे. मधुरिमाराजे यांच्या माघारीने राजेश क्षीरसागर यांचा विजय सोपा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसची हक्काची जागा गमाव‌ल्याचे शल्य निर्माण झाले आहे.

राजू लाटकर सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारीला पाठिंबा मागण्यासाठी जाणार आहेत. माघारीच्या वेळी राजू लाटकर Not reachable होते, त्यामुळे संपूर्ण काँग्रेस आणि आघाडीचे पक्ष राजू लाटकर यांच्या पाठिशी राहणार का ? हा कळीचा मु‌द्दा आहे. त्यातूनही काँग्रेसने आणि आघाडीच्या घटक पक्षाने पाठिंबा दिला तर ते निवडून येतील का ? अपक्ष म्हणून निवडून आले तर ते आघाडीशी बांधील राहतील का ? ज्यांच्या सांगण्यावरून राजू लाटकर Not reachable राहिले, ते राजू लाटकर यांना या परिस्थितीत पाठिंबा देतील का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

काहीही असले, तरी राजेश क्षीरसागर यांना निवडणूकीत विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे चित्र निमाण झाले आहे. असे असले तरी अनून 15 दिवस आहेत. अजून बऱ्याच घडामोडी होणार आहेत. लवकरच याचे चित्र स्पष्ट होईल.

Leave a comment