साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
कार्ल स्पिटलर
Carl Spitteler
जन्म : 24 एप्रिल 1845
मृत्यू : 29 डिसेंबर 1924
राष्ट्रीयत्व : स्विस
पुरस्काराचे वर्ष: 1919
कार्ल स्पिटलर हे स्वित्झर्लंडचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. ‘ऑलिम्पियन स्प्रिंग’ ही त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहे. या काव्यरचनेचाच विचार करून त्यांना 1919 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ‘प्रामेथियस’ हे त्यांचे श्रेष्ठ काव्य आहे. रोमेन रोलँड या फ्रान्सच्या महान लेखकाने त्यांच्या काव्याची स्तुती केली.