दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारी पाम जातीची वनस्पती म्हणजे Acai Palm होय. या वनस्पतीला द्राक्षांसारखी काळ्या- जांभळ्या रंगाची फळे लागतात. या फळांना अकाई बेरी असे म्हणतात. या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. याशिवाय इतर पोषक घटकही आढळतात.अकाई बेरीची फळे पिकली की लगेच खराब व्हायला सुरुवात होतात. म्हणून सुकवलेली अकाई बेरी खाणे अधिक चांगले असते. ही फळे चवीला गोड लागत नाहीत; पण ती पौष्टिक असतात. लोक या झाडाची फळे साखरेच्या पाकात घालून खातात. डार्क चॉकलेट, लाल वाईन बनवण्यासाठी अकाईची फळे वापरतात. सध्या अकाईच्या फळांची मागणी वाढल्याने या वनस्पतींची खास लागवड केली जाते. ही फळे मोठ्या प्रमाणात सुकवून export करतात, ॲमेझॉनच्या जंगल परिसरात अकाईच्या वाढीसाठी पोषक हवामान आहे. म्हणूनच येथे अकाईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.