अमेरिकेतील भव्य Amazon Rainforest मध्ये आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण माकड म्हणजे Howler Monkey होय. आपल्या कळपातील इतर माकडांना सावध करण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी इशारा देण्यासाठी ही माकडे कुकाऱ्या देतात. Howl म्हणजेच मोठ्याने ओरडून इशारा देणे होय. ही माकडे मोठ्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. या माकडांचे Howling सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत ऐकू येते. या हाऊलर माकडांचे घ्राणेंद्रिय अतिशय तीव्र आणि संवेदनशील असून सुमारे 2 किलोमीटर पर्यंतच्या खाद्याचा या माकडांना वास येतो. या माकडांचे आयुष्य 15 वर्षे ते 20 वर्षापर्यंत असते. नर माकडे मादी माकडांपेक्षा वजनाने जास्त असतात.