Amazon Rainforest :Toco Toucan-टोको टूकन

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rain forest मध्ये हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत.तितकेच जलचर आहेत. याच जंगलात सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. Toco Toucan हा असाच एक रंगीत आणि शरीराच्या मानाने मोठी चोच असलेला पक्षी आहेत.हा टोको टूकन दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा आणि आकर्षक असा प्राणी आहे. टोको टूकन या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी अमेझॉनच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो. काळेकुट्‌ट शरीर असलेल्या या पक्ष्याचा गळा पांढरा असून त्याची चोच पिवळसर आणि केशरी रंगाची आहे. हा पक्षी अर्जेंटिना, उरुग्वे या देशांतील जंगलातही मोठ्या प्रमाणात आढळतो. टोको टूकन दीड ते दोन किलोमीटर पर्यंतच्या उंचीपर्यंत सहज उडत उडत जाऊ शकतो. या पक्ष्यांना घनदाट जंगलांपेक्षा खुल्या जंगलातील सहवास आवडतो. विविध झाडांची मांसल फळे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. फळांबरोबरच इतर लहान पक्ष्यांची अंडी सुद्धा टोको टूकनला खायला आवडते.

Amazon forest: Hoatzin: हॉटझिन

Leave a comment