साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जॉर्ज बर्नार्ड शॉ
George Bernard Shaw
जन्म : 26 जुलै 1856
मृत्यू : 2 नोव्हेंबर 1950
राष्ट्रीयत्व : आयरिश/ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1925
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला असला, तरी ते इंग्लंडला स्थायिक झाले. लेखक म्हणून सुरुवातीला काही काळ कष्टाचे गेला असला, तरी नंतर मात्र त्यांना खूप प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली. सामाजिक सुधारणा हे त्यांच्या लेखनाचे मुख्य ध्येय होते. त्यांची ‘सीझर एंड क्लिओपेट्रा’, ‘मॅन एंड आर्म्स’, ‘मॅन एंड सुपरमॅन’, ‘सेंट जोन’, ‘मेजर बार्बरा’ इत्यादी नाटके खूप प्रसिद्ध पावली.