Amazon rainforest :cotinga – कोटिंगा

हे विश्व अनेक प्राणी, पक्षी, जीवजंतू, वनस्पती, खनिजे , हवा, पाणी, जमीन या घटकांनी व्यापलेले आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest या विशाल जंगलातही अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. Cotinga हा पक्षी सुध्दा या ॲमेझॉनच्या जंगलातील एक अविभाज्य घटक आहे. दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हा कोटिंगा पक्षी आढळतो. गडद निळ्या रंगाचा हा कोटिंगा पक्षी चटकन नजरेत भरतो. या पक्षांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नरपक्षी कुटुंबातील पिलांची काहीच काळजी घेत नाहीत. अंडी घालणे, पिलांना संरक्षण देणे, त्यांचे पाषण करणे इत्यादी कामे मादीच करत असते. या पक्ष्याच्या घरट्यात एक किंवा दोन, तीन,चार अंडी असतात. त्यापेक्षा जास्त अंडी नसतात. या कोटिंगा पक्षाच्या घरट्यातील अंडे शत्रूला सहजासहजी सापडत नाही. अंडी उबवण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतातः खुल्या जंगलात, खारफुटी व दमट जंगलात हे पक्षी आढळतात.

Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर

  1. Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर
  2. Amazon Rainforest :Harpy Eagle

Leave a comment