Amazon Rainforest :Harpy Eagle

गरुड हा पक्षी अनेक देशांत आढळतो. भारतात गरुड हा पक्षी दुर्मिळ झाला आहे . दक्षिण आफ्रिकेत गरुडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तशीच दक्षिण अमेरिकेतही गरुड पक्षी आहेत. दक्षिण अमेरिकेच्या भव्य Amazon rainforest मध्ये विशेषत: इक्वेडोर देशात आढळणारा Harpy Eagle हा पक्षी जगातील सर्वांत मोठा गरुड आहे. त्याच्या तीक्ष्ण नख्यांमुळे या गरुडाला Harpy Eagle असे नाव पडले आहे. ॲमेझॉनच्या जंगलात मोठ्या संख्येने हे गरुड आढळतात. हे गरुड आपल्या तीक्ष्ण नख्यांच्या साहाय्याने शिकार करतात. साप, लहान पक्षी, प्राण्यांची पिल्ले हे त्यांचे अन्न असते. या गरुड पक्ष्यांची नजर खूप तीक्ष्ण असते. खूप उंचावरुन किंवा दूरवरून हे गरुड पक्षी आपले भक्ष्य शोधू शकतात. हे पक्षी 7 ते 8 किलोग्रॅम वजनाचे प्राणी पकडून उड्‌डाण करू शकतात. हे हर्पी गरूड पक्षी माणसांना घाबरत नाहीत. ताशी 70 ते 80 किमी वेगाने हे गरुडपक्षी आकाशातून उडत जातात. भक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा वेग आणखीन वाढतो. हार्पी गरुड 100% मांसाहारी असून माकड आरमाडिल्लो, स्लोथ्स असे प्राणी झडप घालून पकडून नेतो.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Amazon Rainforest :Toco Toucan-टोको टूकन
  2. Amazon forest: Hoatzin: हॉटझिन
  3. Amazon rainforest :Howler Monkey

Leave a comment