जगात उंदराच्या असंख्य प्रजाती आहेत. Amazon rainforest मध्ये सुद्धा उंदराच्या अनेक प्रजाती आढळतात . दक्षिण अमेरिकेत आढळणारा हा Red acouchi आपल्या लाल रंगामुळे प्रसिद्ध आहे. हा उंदीर फळांच्या बिया, धान्य खाऊन आपले गुजराण करतो. तो अनेक प्रकारची फळेही खातो. उंदरांच्या दातांची वाढ वेगाने होत असते. त्यामुळे उंदीर सतत काहीतरी कुरतडत असतात. कुरतडण्याची सवय त्याने बंद केली, तर त्याला अन्न खाता येणार नाही आणि जगणेही अशक्य होऊन जाईल. प्राण्यांच्या अन्न साखळीत उंदीर हा महत्त्वाचा घटक आहे. ॲमेझॉनच्या जंगलात उंदीर खाऊन अनेक हिंस्र प्राणी आपला उदरनिर्वाह करतात. ब्राझील, गयाना, सुरीनाम इत्यादी देशांत या लाल रंगाच्या डुकराच्या नाकासारखे नाक असलेल्या उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. पण हिंस्र प्राणी यांची संख्या मर्यादित ठेवतात.