साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
थॉमस मान
Thomas Mann
जन्म: 6 जून 1875
मृत्यू: 12 ऑगस्ट 1955
राष्ट्रीयत्व : जर्मन
पुरस्कार वर्ष: 1929
थॉमस मान हे जर्मनीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांच्या ‘बडन ब्रुक्स’ या कादंबरीला 1929 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्यापूर्वीच त्यांची खूप प्रसिद्धी पसरली होती. त्यांच्या ‘द मॅजिक माउन्टन’, ‘टोनियो ग्रोगर’, ‘डेथ इन व्हेनिस’ या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. ते शालेय जीवनापासूनच लेखन करत होते.