प्रत्येक देश वेगळा, प्रत्येक देशातील राहणीमान वेगळे, प्राणी, पक्षी वेगळे, याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारा kingfisher हा Amazon kingfisher किंवा Amazon water kingfisher या नावाने ओळखला जातो. हा पक्षी पाण्यातील लहान माश्यांची उंचावरुन पाण्यात सूर मारुन पकडतो. हिरव्या किंगफिशर पेक्षा हा ॲमेझॉन किंगफिशर थोडा मोठा असतो. पाण्यात प्रकाश किरण तिरपे जाते. त्यामुळे पाण्यातील वस्तू जेथे आहे, त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी असल्याचे जाणवते. हा अचूक वेध घेण्याची कला kingfisher ला अवगत झालेली असते. या छोट्याशा मादी ॲमेझॉन किंगफिशरचे वजन 120 ते 150 ग्रॅम असते, तर नर किंगफिशरचे वजन 100 ते 120 ग्रॅम असते.
नरापेक्षा मादी आकाराने मोठी असते. ग्रीन किंगफिशर आणि ॲमेझॉन किंगफिशर हे दोन्हीही प्रकारचे पक्षी Amazon rainforest मध्येच आढळतात. उष्ण कटिबंधातील हा पक्षी दक्षिण मध्य अमेरिका ते अर्जेटिना या पट्टयात आढळतो.