दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हमखास आढळणारे फूल म्हणजे Monkey brush vine होय. Amazon rainforest मध्ये आढळणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. Combretum rotundifolium हे या फुलाचे वैज्ञानिक नाव आहे. जेव्हा या कळ्यांचे फुलांत रुपांतर होते, तेव्हा लाल-पिवळ्या रंगांची फुले खूपच सुंदर दिसतात. ही फुले एकदम उमलतात तेव्हा ती ब्रश सारखी दिसतात. हमींग बर्डसाठी ही फुले खूप उपयुक्त आहेत.हमिंगबर्ड या फुलातील मकरंद शोषून घेतात.
Monkey brush vine केवळ दक्षिण अमेरिकेत आढळत नाही, तर जगातील अनेक देशांत आढळतात. प्रत्येक देशातील भूप्रदेश, हवामान यानुसार या फुलांच्या आकारात आणि रंगात फरक पडतो. भारतातही हे मंकी ब्रश वाईन फुलझाड आढळते. विशेष म्हणजे या फुलझाडाचा वापर विविध बागांमध्ये सुशोभनासाठी करतात. याशिवाय या फुलझाडांचा उपयोग इनडोअर सुशोभनासाठी सुद्धा करतात. कडक थंडीच्या प्रदेशातील हवामान या फुलझाडांसाठी उपयुक्त नाही. या प्रदेशात ही फुलझाडे जिवंत राहू शकत नाहीत.