दक्षिण अमेरिकेतील भव्य Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. तसेच हजारो प्रकारचे कीटक पाहायला मिळतात. Bullet ant हा कीटक वर्गातील प्राणी आहे.
पॅरापोटेरा क्लावाटा [ Paraponera clavata ] हे तिचे नाव आहे. ती बुलेट अँट या नावानेच ओळखली जाते. ही मुंगी अत्यंत वेदनादायक असा डंख मारते. या मुंगीची लांबी 18 ते 30 सेमी पर्यंत असते. त्यांना पंख नसतात. तांबूस काळ्या रंगाच्या या मुंग्या प्रचंड विषारी असतात. संकटाची चाहूल लागते, तेव्हा ही मुंगी डंख मारुन आपला बचाव करते. या मुंग्या झाडांवर, जमिनीमध्ये वास्तव्य करतात. या मुंग्या समुहाने आणि एकजुटीने काम करतात, या मुग्यांतील प्रमुख एक राणी मुंगी असते. ती इतर मुंग्यांपेक्षा फारशी मोठी नसते. इतर वेळी या बुलेट मुंग्या आक्रमक नसतात; पण आपल्या घरट्याला संरक्षण देतेवेळी प्रचंड आक्रमकपणे शत्रूवर हल्ला करतात आणि शत्रूला विषारी डंख मारुन घायाळ करतात.