दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये पक्ष्यांच्या 1300 हून अधिक प्रजाती असल्या तरी भडक रंग असलेला एक छोटा पक्षी असा आहे की त्याच्या पंखांच्या जलद हालचालीमुळे गुंजारव तयार होतो. म्हणूनच या पक्ष्याला hummingbird असे नाव पडले आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मधील हा एक स्थानिक पक्षी असून त्याच्या गुंजारवमुळे तो जगप्रसिद्ध झाला आहे. सध्या या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले असले तरी अजूनही हा पक्षी या ॲमेझॉनच्या जंगलात आढळतो. या छोट्याशा पक्षाची लांबी 7.5 ते 13.5 सेमी पर्यंत असू शकते. सर्वांत लहान Humming Bird ची लांबी 5 सेमी पर्यंत असते. या लहान पक्षाला मधमाशी हमींग बर्ड असे म्हणतात. या हमींग बर्डचे वजन 15 ते 25 ग्रॅम असते. सर्वांत लहान हमिंगबर्डच्या पंखांचे प्रतिसेंकंद 80 बीट्स होतात, तर मोठ्या हमींगबर्डच्या पंखांचे बीट्स प्रतिसेकंद 12 होतात.
Amazon Rainforest: Golden Headed Manakin – सोनेरी डोक्याचा मानकीन