Amazon rainforest: Arpaima Gigas

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेल्या विशाल ॲमेझॉन नदीत हजारो प्रकारचे जलचर आढळतात. त्यांतील arpaima gigas fish हा एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर मासा आहे. हा मासा ॲमेझॉन जंगल परिसरातील लोकप्रिय मासा आहे. जगातील भव्य गोड्या पाण्यातील हा मासा आहे. या पूर्ण वाढ झालेल्या अर्पाइ‌मा माश्याचे वजन 200 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते. या माश्याची लांबी 7 ते 8 फूट असते. अर्पाईमा मासा खाण्यासाठी खूप चांगला असतो. स्वतःच्या रक्षणाच्या वेळी ते खूप आक्रमक बनतात. या माश्याला red fish या नावाने सुद्धा ओळखले जाते. अर्पाईमा मासा पाण्यात जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटे राहू शकतो. कारण त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. हा काही सस्तन प्राणी नाही. या माश्याची मादी एका वेळी हजारो अंडी घालते. त्यांतील काहीच अंड्यांपासून नवीन प्रजाती तयार होते.अनेक अंडी पाण्यातील इतर जलचर खाऊन टाकतात. म्हणूनच arpaima gigas माश्यांना पुढील पिढी जोपासण्यासाठी भरपूर अंडी घालावी लागतात.

Amazon Rainforest: Giant otter: राक्षसी पाणमांजर

Leave a comment