Amazon Rainforest : Arpendola- आर्पेंडोला

भारतात आढळणारा सुगरण पक्षी आणि दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणारा Arpendola हा पक्षी यांच्यात घरटे बांधण्याच्या कृतीत खूप साम्य आहे. सुगरण पक्षाचे घरटे बांधण्याची पद्धत आणि आर्पेंडोला या पक्षाचे घरटे बांधण्याची पद्धत सारखीच आहे. गवतांच्या काड्यांच्या साहाय्याने हे पक्षी आपली घरटी बांधतात. Arpendola हा पक्षी रंगाने काळा असून सारोकोलियस वंशातील आहे. हे पक्षी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. या पक्ष्यांच्या शेपटीची लांब पिसे पिवळ्या रंगाची असतात, त्यांच्या चोचीही साधारण पिवळ्या रंगाच्या असतात. हे पक्षी प्रजनन काळात अंडी घालण्यासाठी घरटी बांधतात. घरटी झाडांच्या टोकांना लोंबकळत असतात. सुरक्षा म्हणून ती घरटी अशी बांधलेली असतात. हे पक्षी कीटक, फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात.दक्षिण मोक्सिको , मध्यवर्ती कोस्टारिका, पनामा, कोलंबिया, इक्वेडोर इत्यादी देशात हे पक्षी आढळतात.

Amazon rainforest : Hummingbirds

Leave a comment