Amazon rainforest : Motmot bird: मॉटमॉटपक्षी

प्राण्यांच्या विविध प्रजातीप्रमाणेच जगाती विविध पक्ष्यांच्याही प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये सुद्धा पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. Motmot हा पक्षी सुद्धा आकार, शेपटी आणि रंग यांच्या बाबतीत खूप वेगळा आहे. Kingfisher, bee-eater या प्रक्ष्यांप्रमाणेच हा Motmot पक्षी आहे. हे पक्षी शिकार करून सरडे, कीटक खातात. फळे पण खातात. विशेष म्हणजे विषारी डार्ट बेडकांना सु‌द्धा खातात. अडचणीच्या ठिकाणी ढोलीत घरटे बांधून त्यात तीन-चार अंडी घालतात. अंडी उबवण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागतो. या motmot पक्ष्याचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे शेपटीच्या टोकाला झुपके असतात. या झुपक्यांचा उपयोग तो कीटकांना आकर्षित करण्यासाठी करतो. नराची शेपटी मादीच्या शेपटीपेक्षा लांब व मोठी असते. मानव प्राण्यासाठी Motmot हा पक्षी अजिबात धोकाधायक नाही. या पक्षाची लांबी सुमारे 40 सेमी असते. बहुतेक सर्व मॉटमॉट पक्ष्यांच्या डोक्यावर आणि पंखांवर चमकदार निळ्या रंगाचा स्पर्श असतो. हे पक्षी तपकिरी हिरव्या रंगाचे असतात. जगातील अनेक प्राण्यांचे आणि पक्षांचे अस्तित्व धोकादायक अवस्थेत आहे.अमेरिकेतील ॲमेझॉनच्या जंगलातील अनेक पक्ष्यांचे व प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा 

Leave a comment