साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
इवान बुनिन
Ivan Bunin
जन्म : 22 ऑक्टोबर 1870
मृत्यू : 8 नोव्हेंबर 1953
राष्ट्रीयत्व : रशियन
पुरस्कार वर्ष : 1933
इवान बुनिन हे रशियाचे पहिले साहित्यिक आहेत की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रथम मिळाला. ते कवी आणि कादंबरीकार होते. त्यांना रशियातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक मानले जात होते. त्यांनी कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. रशियन क्रांतीनंतर ते फ्रान्सला राहायला गेले. ‘दि जंटलमैन फ्रॉम सॅनफ्रान्सिको’ ही त्यांची सर्वश्रेष्ठ रचना मानली जाते.