Amazon rainforest: Hot lips

फुलांना, फळांना, वनस्पतींना, प्राण्यांना, पक्ष्यांना जी काही नावे ,दिलेली आहेत, त्यांतील बहुतांश नावे ही त्यांच्या गुणधर्मावरून, आकारावरुन , रंगांवरून आणि रचनेवरून दिलेली आहेत. Hot lips हे फूलही असेच आहे. या फुलाची रचना मानवी ओठांसारखी असून मधोमध अर्धवट जीभ बाहेर काढल्यासारखे पुंकेशर-स्त्रीकेशर दिसतात. या फुलाचा रंग गडद लाल असल्याने त्याला Hot lip असे म्हटले जाते. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये वास्तव्य असलेले हे Hot lip हे फूल खूप आकर्षक आणि सौंदर्यसंपन्न आहे. या फुलाचे Salvia microphylla असे वैज्ञानिक नाव आहे. ॲमेझॉनच्या जंगलातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हे फूल आढळते. फुलपाखरांना आणि हमिंगबर्ड्स यांना आकर्षित करून hot lips हे आपले परागीभवन घडवून आणते.
प्रत्येक फुलांमध्ये परागीभवनाच्या कला नैसर्गिकरीत्या विकसित झालेल्या असतात. परागीभवनामुळे वनस्पतींची पुनर्निर्मिती होण्याची प्रक्रिया अखंडितपणे पुढे चालू राहते. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची कला या Hot lip मध्ये असते.

Amazon Rainforest: Orchid – ऑर्किड

Leave a comment