Amazon Rainforest :Banana – केळी

Banana हे फळ माहिती नाही असे कोणी असेल का ? निश्चितच नाही. केळीचे फळ जगात सर्वत्र मिळते. जगातील अनेक देशात केळीची शेती केली जाते. वेगवेगळ्या देशात केळीच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. भारतीय जंगलात सुद्धा अद्याप केळीच्या काही प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींना लहान आकाराची केळी लागतात. अगदी हाताच्या बोटांएवढी. द‌क्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये Banana ची वनस्पती आढळते. जंगलातील अगदी खडकाळ प्रदेशातही ही वनस्पती पाहायला मिळते. भरपूर पोटॅशियम असलेले हे फळ सर्वांनी खाल्लेले आहे; पण जैविक शास्त्रानुसार या फळाचे कूळ (family) berry आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ? निश्चितच नसेल. असेलही. berry family मधून आलेले हे केळीचे फळ सर्वांना आवडते. सगळीकडे ही फळे गुच्छ स्वरुपात आढळतात.त्याला घोस किंवा घड असे संबोधतात. एका घोसमध्ये 100 ते 300 फळे असू शकतात. ही केळी खाण्यासाठी योग्य होण्यासाठी केळीची लागण केल्यापासून सुमारे 11 ते 15 महिने लागतात. नैसर्गिक रीत्या पिकलेले गोड आणि खाण्यास चांगले असते. कार्बाईडच्या साहाय्याने पिकवलेली फळे खाऊ नये.

Amazon Rainforest :Acai Palm: अकाई पाम

Leave a comment