दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या घनदाट अरण्यात विविध प्रकारचे साप आढळतात. Fer-de-lance हा सुद्धा त्यांतीलच एक प्रकारची जात आहे. टेर्सि ओपेलो[fer-de-lance] ही एक Pit Viper ची प्रजाती असून मेक्सिकोपासून उत्तर अमेरिकेपर्यंत पसरलेल्या भव्य विस्तीर्ण प्रदेशात फर-द-लान्स सापाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या सापाला फर-द-लान्स, कार्पेट लॅबरिया, बार्वा अमरिला, इक्वीस अशी विविध नाव आहेत. हा साप Fer-de-lance या नावानेच जगभर प्रसिद्ध आहे. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डोके रुंद व चपटे आहे. या सापाला पटकन ओळखण्यासाठी त्याचे डोके पाहिले जाते.त्याचे डोके गडद तपकिरी, नकळत काळसर असते. अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे असतात. हे साप सरासरी 6 किलोग्रॅम वजनाचे असतात. याची लांबी 1.5 ते 2 मीटर असते. या नर सापाला दोन लिंग असतात. बहुतेक सर्व सापांना दोन लिंग असतात. समागमाच्या वेळी पहिले लिंग तुटले तर दुसऱ्या लिंगाचा वापर केला जातो. नरापेक्षा मादी चपळ असते. तिच्या वाढण्याचा वेगही जास्त असतो. नरापेक्षा तुलनेने मादीची डोकी मोठी असतात. दक्षिण अमेरिकेतील विविध देशांत या सापाचे अस्तित्व आहे.