वायनाडमध्ये प्रियांका गांधींचा विक्रमी विजय
राहूल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच जागेवर प्रियांका गांधी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. 16 नोव्हेंबर 2024 रोजी वायनाड लोकसभेची पोटनिवडणूक आली. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला असून वायनाडमधून विजयी होऊन प्रियांका गांधी प्रथमच खासदार होत आहेत. एप्रिल 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी यांना 3.6 लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी तर कमालच केली. त्यांना सहा लाखाहून अधिक मते मिळाली असून त्यांचा विजय 4 लाखाहून अधिक मताधिक्याने झाला आहे. प्रियांका गांधी यांचा विजय निश्चितच काँग्रेसला बळ देणारा आहे.
परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आणि संशयास्पद लागला आहे. महायुतीला अनपेक्षितपणे 225 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. विरोधी महाविकास आघाडीला जेमतेम 50 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस एक भक्कम विरोधी पक्ष होत असताना महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक आणि चिंतनीय आहे.