AI-तंत्रज्ञान-एक धोकादायक घंटा
प्रगतीचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी माणसानेच आपल्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर AI Technology विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाचा सध्या प्रचंड उपयोग होत आहे. उद्या भविष्यात Share-marketing क्षेत्रात AI चा क्रांतिकारक उपयोग होणार आहे. कोणता शेअर घ्यायचा? कोणत्या क्षणी घ्यायचा ? कोणत्या क्षणी विकायचा ? यासाठी AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. Equity आणि Indra Day marketing साठी AI चा उपयोग होऊ शकतो.
शेअर मार्केटिंग क्षेत्रात नामांकित व्यक्तींचा डमी रोल बनवून ती व्यक्तीच बोलत आहे. आणि x, y, z हे stock घेतल्यास तुम्हाला भरपूर फायदा कसा होणार आहे, हे ती व्यक्ती पटवून देत असते. रतन टाटा, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, निर्मला सीताराम अशा व्यक्तींचा तंतोतंत आवाज देऊन आणि तंतोतंत तसाच चेहरा बनवून व्हिडिओ त्यार करून फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर आणि युट्युबवर टाकले जातात. नामांकित व्यक्ती सल्ला देत आहे. त्यामुळे आपण असे स्टॉक घेतले पाहिजेत. अशी आपल्या मनाची धारणा होते. आणि मग आपणे असे स्टॉक घेऊन मोठी गुंतवणूक केल्यास आपली फसवणूक होण्याचीच अधिक शक्यता असते. याशिवाय इतर सल्लेही दिले जातात. म्युच्युअल फंडातही अशा व्यक्तींच्या तोंडून सल्ले दिले जातात.
अशा व्हिडिओपासून किंवा ऑडिओपासून आपण नेहमी सावधान आणि सतर्क असले पाहिजे.