भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या राज्यांना चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडू पुद्दुचेरी, आंध्रप्रदेश या राज्यांना अधिक धोका संभवत आहे. या शिवाय बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्याना धोक्याचा इशारा दिला आहे.
अंदमान समुद्रात उगम पावलेले हे फेंगल चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे. खबरदारी म्हणून भारत सरकारने NDRF च्या 17 तुकड्या तैनात केला असून त्यांना सतर्कतेने काम करण्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ अचानक कोणत्या दिशेला झेप घेईल याचा नेम नसल्याने तामिळनाडू, ओडिशा, आंध्रपदेश, बिहार, पश्चिम बंगाल या पाचही राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्वांत जास्त धोका तामिळनाडू राज्यातील तीन जिल्ह्यांत आणि पुद्दुचेरीला रेड अलर्ट जारी केला आहे. या भागत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चेन्नई, तिरुवरूर, नागापटिनम, कुड्डालोर, तंजावर जिल्ह्यांत कडेकोट बंदोबस्त ठेवला असून अंदमान समुद्रात पेंगल चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे.म्हणूनच भारत सरकार सतर्क आहे.