साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
फ्रँकोईस मॉरियाक
Francois Mauriac
जन्म : 11 ऑक्टोबर 1885
मृत्यू : 1 सप्टेंबर 1970
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1952
फ्रँकोईस मॉरियाक हे फ्रान्सचे अष्टपैलू प्रतिभाशाली साहित्यकार होते. त्यांनी कादंबऱ्या, निबंध (लेख), नाटके इत्यादींचे लेखन केले. त्यांनी पंचवीसहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘द वाइपर्स टँगल’ ही त्यांची एक उत्कृष्ट कादंबरी मानली जाते. त्यांची काही नाटके रंगमंचावर सादर झालीत.