1. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर नियमित पपई खायला हवी.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते . ते पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. कोणत्याही आजारांशी लढण्यात मदत करण्याचे काम करणे आणि रोगांपासून आपला बचाव करण्याकमी पपई उपयुक्त ठरते.पपईमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकतात आणि आपले शरीर डिटॉक्स (Detox) करतात .
2. आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते .
शरीरातील कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढल्यामुळे लठ्ठपणा आणि हृदय विकाराचा धोका निर्माण होतो . त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे . पपई खाल्ल्याने हा धोका कमी होऊ शकतो. पपईतील फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करून हृदयाच्या आरोग्यास मदत करते. पपई मध्ये लाइकोपीन आणि बीटा-कॅरोटीन सारखे अँटीऑक्सिडेंट असतात. जे रक्तदाब कमी करतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
3. डोळ्यांचे आरोग्य सुधारते
व्हिटॅमिन ए( Vitamin A ) आणि बीटा-कॅरोटीन (beta-carotene): आवश्यक असते.पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे आपली दृष्टी चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पपईतील पोषक घटक मोतीबिंदू यांसारख्या परिस्थितींपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात.
ल्युटीन (Lutein): पपईमध्ये ल्युटीन देखील असते.ल्युटिन हे एक अँटिऑक्सिडेंट असू ते हानिकारक निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करते.
4. त्वचा चमकदार व निरोगी राहते
त्वचा चमकदार व निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात क जीवनसत्व भरपूर असणे आवश्यक आहे.व्हिटॅमिन सी (Vitamin c) चे पपईमध्ये प्रमाण जास्त असते. ते कोलेजन चे प्रमाण वाढवते .त्यामुळेच त्वचेची लवचिकता आणि सुरकुत्या रोखण्यासाठी मदत करते.
व्हिटॅमिन ए (vitamin A ): पपईमधील बीटा-कॅरोटीन मुळे त्वचा निरोगी राहते . त्यामुळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत करते .
हायड्रेशन (Hydration): पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आपली त्वचा चमकदार दिसते
5.वजन कमी करण्यास मदत होते
वजन कमी करण्यास पपईची खूप मदत होते.पपईमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यांना वजन नियंत्रित करायचे असेल किंवा कॅलरी कमी करू इच्छितात त्यांच्यासाठी पपई खाणे एक उत्तम उपाय आहे .
पपई मध्ये फायबर असतात . त्यामुळे भूक नियंत्रित करण्यास आणि जास्त खाणे टाळण्यास मदत होते. शिवाय पोट साफ होण्यास मदत होते.
नियमित पपई खा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.