Natural structure of Maharashtra : महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

(अ) कोकण किनारपट्टी:

महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्र-किनारा लाभलेला आहे. सुमारे 720 कि.मी. लांबीच्या या किनाऱ्याला 100 ते 150 कि.मी. रुंदीची जी किनारपट्टी लाभलेली आहे. तिलाच ‘कोकण किनारपट्टी’ म्हणतात.

कोकण किनारपट्टी खूप अरुंद आहे. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. तसेच या नद्या उथळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच या नद्यांतील पाणी कमी येते. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. विजयदुर्ग, वसई, ठाणे, राजापूर, जयगड, दाभोळ, धरमतर, तेरेखोल या कोकणातील प्रमुख खाड्या आहेत.

(ब) पश्चिम घाट (सह्याद्री):

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला लागून दक्षिणोत्तर पसरलेली पर्वतरांग म्हणजे ‘सह्याद्री’ होय. सह्याद्री पर्वतरांगांनाच ‘पश्चिम घाट’ असे म्हणतात.

(a) सह्याद्री पर्वताच्या प्रमुख रांगा: सह्याद्री पर्वताच्या चार प्रमुख रांगा आहेत.

(१) सातमाळाचे डोंगर (नाशिक परिसर),

(२) अजिंठा डोंगर (औरंगाबाद,जळगाव),

(३) बालाघाट डोंगर (अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड),

(४) महादेव डोंगर (सातारा).

(b) सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट:

(१) थळ घाट (कसारा घाट, मुंबई-नाशिक),

(२) आंबा घाट -कोल्हापूर-रत्नागिरी.

(३) फोंडा घाट (बेळगाव-सावंतवाडी),

(४) कुंभार्ली घाट (कराड-चिपळूण),

(५) बोर / खंडाळा घाट (मुंबई-पुणे).

(६) माळशेज घाट-ठाणे-अहमदनगर

(७) आंबवेळी घाट.. महाबळेश्वर-महाड

(८) आंबोली घाट (बेळगाव-सावंतवाडी).

(c) सह्याद्री पर्वतातील उंच शिखरे :

(१) कळसूबाई (अहमदनगर- नाशिक सीमेवर उंची 1646 मीटर),

(२) साल्हेर (1567मी.),

(३) महाबळेश्वर (1438 मी.),

(४) हरिश्चंद्रगड (1424 मी.),

(५) सप्तशृंगी 1416 मी.),

(६) तोरणा (1404 मी.),

(७) त्र्यंबकेश्वर (1304 मी.)

(क) महाराष्ट्र पठार :

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस महाराष्ट्र पठार पसरले आहे. महाराष्ट्र पठार उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा व तापी खोरेपर्यंत व दक्षिणेकडे कृष्णा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरले आहे. या पठारावर गोदावरी, कृष्णा व भीमा नद्यांच्या खोऱ्यांबरोबरच अनेक लहान-मोठी खोरी आहेत.

सातपुडा पर्वतरांगांना अमरावती जिल्ह्यात ‘गाविलगड’ म्हणतात, तर नंदुरबार जिल्ह्यात ‘तोरणमाळ’ म्हणतात. या पठाराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची 900 मीटर आहे.

Leave a comment