साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
इव्हो अँड्रिच
Ivo Andric
जन्म : 10 ऑक्टोबर 1892
मृत्यू :13 मार्च 1975
राष्ट्रीयत्व : युगोस्लाव्हियन
पुरस्कार वर्ष: 1961
इव्हो अँड्रिच हे युगोस्लाव्हियाचे श्रेष्ठ कादंबरीकार आणि कथाकार होते. त्यांनी युगोस्लाव्हियाचे राजदूत म्हणून जर्मनीत काम केले होते. त्यानंतर त्यांनी ‘बोस्नियन स्टोरी’, ‘ब्रिज ऑन द ड्रिना’, ‘वुमेन फ्रंट साराजिओ’ या तीन कादंबऱ्या लिहिल्या. त्या खूपच प्रसिद्ध पावल्या. त्यांचे लेखन खूपच शालीन आणि शुद्ध होते.