साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जॉन स्टेनबेक
John steinbeck
जन्म : 27 फेब्रुवारी 1902
मृत्यू: 20 डिसेंबर 1968
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1962
जॉन स्टेनबेक या अमेरिकन कादंबरीकाराला 1930 च्या दरम्यान खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या लेखनात वास्तविकता होतीच, त्याचबरोबर कल्पनाविश्वालाही वाव होता. ‘द ग्रेप्स ऑफ ब्राथ’, ‘इन ड्युबिअस बॅटल’, ‘ऑफ माइस एंड मॅन’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांच्या कादंबरीलेखनातील योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला.