साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जॉर्ज सेफेरिस
Giorgos Seferis
जन्म: 13 मार्च 1900
मृत्यू : 20 सप्टेंबर 1971
राष्ट्रीयत्व : ग्रीक
पुरस्कार वर्ष: 1963
1930 च्या दशकातील ग्रीकमधील सुप्रसिद्ध कवी म्हणून जॉर्ज सेफेरिस यांची ख्याती पसरली होती. त्यांनी आधुनिक युनानी कवितांमध्ये प्रतीकवाद प्रयोगाचा आरंभ केला. ‘टर्निंग पॉईंट’, ‘बुक ऑफ एक्सरसाइज’, ‘लॉग बुक’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी काव्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 1963 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.