साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जीन पॉल सॉर्टू
Jean Paul Sartre
जन्म: 21 जून 1905
मृत्यू : 15 एप्रिल 1980
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1964
जीन पॉल सॉर्टू हे फ्रान्सचे तत्त्वज्ञानी आणि विचारवंत होते. त्यांची फ्रान्समध्ये कादंबरीकार, नाटककार म्हणूनही ख्याती होती. ते मानवाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असत. 1964 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर केला, परंतु तो स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. ‘सायकॉलॉजी ऑफ इमॅजिनेशन’, ‘बिईंग अँड नथिंगनेस’ आणि ‘अंडरस्टैंडिंग’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.