आपल्याला नेहमीच उत्साही राहायचे असेल तर नक्कीच आपले रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण चांगले असावे लागते. काही माणसे नेहमी निरूत्साही असतात. याचे मुख्य कारण आहे त्यांच्या शरीरातील रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण खूपच कमी असते.
हिमोग्लोबीन कमी असल्यास शरीरात रक्ताची कमतरता जाणवते, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि शारीरिक दुर्बलता निर्माण होते . हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारातील योग्य पदार्थ, जीवनशैलीतील बदल आणि काही नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात. तर यावर असणारे उपाय आपण जाणून घेऊया.
1. आहारात समाविष्ट करावयाचे पदार्थ:
लोहयुक्त अन्न (Iron-rich Foods):
बीट (Beetroot) – रक्तातील लोखंड वाढवण्यासाठी उपयुक्त.
सुकामेवा – खजूर, मनुके, अंजीर, आणि बदाम.
पालक, मेथी, चवळी यांसारखी हिरव्या पालेभाज्या.
मांस आणि मासे – यामध्ये हेम आयर्न असते, जे शरीराला सहजपणे मिळते.
डाळी आणि कडधान्ये – मसूर, चणे, हरभरा.
तांदूळ आणि गहू – अशा धान्यांचे सेवन.
विटामिन सीयुक्त अन्न (Vitamin C-rich Foods)
जीवनसत्व सी हे शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते . यासाठी लिंबू, आवळा, संत्री, टोमॅटो यांचा आहारात समावेश करा.
फॉलेटयुक्त अन्न (Folate-rich Foods)
फॉलेट (फॉलिक ऍसिड) हीमोग्लोबिन तयार करण्यासाठी उपयोगी आहे. यासाठी पपई, संत्री, आणि भोपळ्याच्या बिया यांचा आपल्या आहारात समावेश करा.
कॅरोटीनयुक्त पदार्थ (Carotene-rich Foods)
गाजर, भोपळा, गोड बटाटे हे कॅरोटीनयुक्त पदार्थ आहेत .यांचा आहारात समावेश करा. यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
2.जीवनशैलीतील बदल
१. नियमित व्यायाम
व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हीमोग्लोबिन पातळी सुधारते.
2. योगाभ्यास:
प्राणायाम, भस्त्रिका, आणि अनुलोम-विलोम यासारखे श्वसन प्रकार रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नियमित योगाभ्यास करावा
3. सिगारेट, तंबाखू, आणि अल्कोहोल टाळा:
या सवयींमुळे शरीरातील पोषण घटक कमी होतात आणि रक्तनिर्मितीवर परिणाम होतो. यामुळे सिगारेट, तंबाखू ,अल्कोहोल यांसारखे घटक पदार्थ घेणे टाळावे .
३. नैसर्गिक उपाय
बीट आणि गाजराचा रस: बीट आणि गाजराचा रस दररोज पिणे फायदेशीर आहे.
आवळा रस किंवा चूर्ण: आवळा हा विटामिन सी चा चांगला स्रोत आहे , जो लोह शोषण्यासाठी मदत करतो. त्यामुळे सुद्धा हिमोग्लोबीन वाढण्यासाठी मदत होते.
गुळ आणि तीळ: गुळामध्ये लोखंड असते आणि तीळ लोह शोषून घेण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे हिमोग्लोबीन वाढते हळद आणि दूध पिणे फायदेशीर असते ज्यामुळे रक्तसंचार सुधारण्यासाठी मदत होते.
४. या गोष्टी टाळा
कॅल्शियमयुक्त अन्न एकाच वेळी खाणे टाळा : दूध, पनीर यांसारखे पदार्थ खाणे टाळा . हे लोह शोषण कमी करतात.
जास्त प्रमाणात चहा आणि कॉफी टाळा : यात असणारे टॅनिन्स लोखंड शोषण्यास अडथळा आणतात त्यामुळे कॉफी किंवा चहा जास्त प्रमाणात घेऊ नये.
जर तुम्हाला हीमोग्लोबिन कमी असल्याचे निदान झाले असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन आयर्न सप्लिमेंट्स घ्या.
संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि योग्य जीवनशैलीमुळे हीमोग्लोबिन पातळी सुधारू शकते. नैसर्गिक उपायांबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे.