Kinds of Soil in Maharashtra महाराष्ट्रातील मृदा प्रकार

(A) महाराष्ट्रातील मृदा प्रकार :

(1) काळी मृदा (रेगूर): Black Soil

काळी मृदा महाराष्ट्र पठारावरील प्रदेशात आढळते. ही मृदा सुपीक असून या मातीत उत्पादनक्षमता अधिक आहे.

(2) तांबडी माती : Red Soil

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत तांबडी माती आढळते. या जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम आहे.

(3) लवण मृदा : Salty Soil

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या भूप्रदेशात समुद्राचे पाणी शिरून ‘लवण मृदा’ बनलेली आहे. या जमिनींना ‘खारजमिनी’ असेही म्हणतात.

(B) गुणवत्तेनुसार महाराष्ट्रातील जमिनीचे ढोबळ प्रकार : Quality and kinds of Soil

(1) हलकी जमीन : Light Soil

या प्रकारच्या जमिनीत 60 ते 90 % रेती असते. ही जमीन कमी सुपीक असते व पाण्याचा निचरा उत्तम असतो.

(2) मध्यम जमीन : Median Soil

या जमिनीत 40 ते 60 % रेती असते. जलधारणक्षमता व सुपीकता मध्यम असते.

(3) भारी जमीन: Heavy Soil

या जमिनीत 10 ते 40 % रेती असते. जलधारणक्षमता अधिक असते. सुपीकता उत्तम असते.

(4) क्षारयुक्त जमीन: Salty Soil

या जमिनीत पाणी जिरत नाही. जमिनीच्या वर पांढरट क्षार असतो. या जमिनीचे पोषणमूल्य अत्यंत कमी असून ही जमीन सतत पाणी साठून राहिल्याने क्षारयुक्त बनते.

(C) जमिनीचे गुणधर्म ठरवणारे घटक :Factors that maintain soil properties

(1) जमिनीचा पोत : Soil Texture

जमिनीचा पोत ठरवण्यासाठी जमिनीतील मातीच्या कणांचा आकार विचारात घेतात.

(2) जमिनीचा निचरा : Drainage Of Soil

जमिनीच्या जलधारण क्षमतेवर पाण्याचा निचरा अवलंबून असतो.

(3) जमिनीचा रंग : Colour Of Soil

जमीन ज्या खडकापासून बनलेली असते, त्या खडकाचा रंग तिला प्राप्त झालेला असतो.

(4) जमिनीतील रासायनिक घटक : Chemical Matters Of Soil

लोह, क्षार, सोडिअम, अभ्रक, मॅग्नेशिअम यांसारखे घटक या जमिनीत असतात.

(5) सेंद्रिय पदार्थ : Organisms

या जमिनीत कुजलेल्या वनस्पती व प्राण्यांचे अवशेष असतात.

(6) सूक्ष्म जीव : Micro Organisms

सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे सूक्ष्म जीव काही जमिनीत असतात.

(d) जमिनीचा सामू (PH Of Soil) :

जमीन आम्लधर्मी आहे की अल्कधर्मी आहे हे ठरविण्याची कसोटी म्हणजेच ‘जमिनीचा सामू’ होय. जमिनीचा सामू म्हणजे PH सात असेल तर जमीन सम असल्याचे समजतात. सामू सातपेक्षा कमी असेल तर जमीन ‘आम्लधर्मी’ समजली जाते व सामू सातपेक्षा जास्त असेल तर जमीन ‘अल्कधर्मी’ समजली जाते.

Leave a comment