साई लाइफ सायन्सेसचा IPO 11 डिसेंबर 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आणि 13 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. या IPO अंतर्गत कंपनी ₹3,042.62 कोटी उभारण्याचा मानस आहे, ज्यामध्ये ₹950 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹2,092.62 कोटींचा विक्रीसाठी ऑफर समाविष्ट आहे.
Price Band: ₹522 ते ₹549 per share
minimum bid size: 27 शेअर्स.
Listing Date: 18 डिसेंबर 2024.
ग्रेस मार्केट प्रीमियम (GMP): सध्या ₹35 प्रति शेअर आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक उत्साह दिसत आहे.
कंपनीची ओळख:
साई लाइफ सायन्सेस ही एक Contract Research and Development Organization (CRDMO) आहे, जी औषध संशोधन, विकास आणि उत्पादन या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या फार्मा कंपन्यांना सेवा पुरवते. या क्षेत्रातील मजबूत ग्राहकवर्ग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव असल्यामुळे ही कंपनी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक मानली जात आहे.
GMP नुसार शेअर लिस्टिंग चांगल्या प्रीमियमसह होण्याची शक्यता आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढीचा फायदा कंपनीला मिळू शकतो. कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.