साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
नेल्ली साख्स
Nelly Sachs
जन्म : 10 डिसेंबर 1891
मृत्यू : 12 मे 1970
राष्ट्रीयत्व : जर्मन/स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1966
नेल्ली साख्स या कवयित्रीचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता, परंतु त्या स्वीडनमध्ये राहायला गेल्या आणि तेथेच स्थायिक झाल्या. त्यांनी आपल्या कवितांमधून आणि नाटकांतून यहुदी लोकांच्या जीवनातील दुःख, यातना यांवर प्रकाश टाकला. त्यांनी अत्यंत कमी वयात कविता लिहिण्यास सुरुवात केली. ‘लिजेंट्स एंड स्टोरिज’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह होता. ‘जर्नी इन्टू अ डस्ट लेस रेल्म’, ‘अ क्लिप्स ऑफ द स्टार्स’ हे कवितासंग्रहही सुप्रसिद्ध आहेत.