Buddha Life Story-Part 21 :सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग

शाक्य संघात झालेल्या पराभवामुळे आणि कोरियांविरुद्ध शाक्यांनी पुकारलेल्या युद्धात सह‌भागी होण्यास नकार दिल्यामुळे शाक्य संघाने दिलेली शिक्षा म्हणून सिद्धार्थने परिव्रजेचा (संन्यास) निर्णय घेतला होता. पत्नी यशोद‌रेने या परिव्रज्येसाठी दिलेल्या संमतीमुळे सिद्धार्थचे मन थोडे हलके झाले होते.आपल्या पुत्राचे, पत्नीचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे वात्सल्यवृत्तीने पाहून सिद्धार्थ यशोद‌रेच्या महालातून बाहेर पडला.

कपिलवस्तु नगरातच भार‌द्वाज ऋषीचा आश्रम होता. या आश्रमात जाऊन भारद्वाज ऋषीच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा निर्णय सिद्धार्थ गौतमाने घेतला होता.

दुसर्‍याच दिवशी सकाळी आपल्या आवडत्या कंटक घोड्यावर बसून छन्न या सेवकाला घेऊन सिद्धार्थ भारद्वाज ऋषीच्या आश्रमाकडे निघाला. तो आश्रमाजवळ येताच लोकांनी त्याला पाहायला गर्दी केली होती. सि‌द्धार्थ जवळ येताच सर्वांनी त्याला नमन केले. त्याच्या भोवताली सर्व लोक गोळा झाले होते. त्याचे अप्रतिम सौंद‌र्य आणि सुडौल शरीरयष्टी पाहून सारेच मंत्रमुग्ध झाले होते. स्त्रिया तर आपल्या समोर कामदे‌वच उभा असल्याच्या कुजबुजत होत्या. सिद्धार्थ मात्र धीर गंभीर होता. त्याच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. मुखावर हास्य नव्हते की करुणा. त्याच्या परिव्रज्याच्या निर्णयाने सर्व स्त्रिया हळहळत होत्या. सिद्धार्थने त्या घोळक्यातून सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दिशेने तो निघाला. आपल्या माता पित्याने आश्रमात येऊ नये , अशी सि‌द्धार्थची इच्छा होती. कारण परिव्राजक स्वीकारताना सि‌द्धार्थाला पाहणे हे त्यांच्यासाठी करु‌णादायी होते, पण त्याचे मातापिताही आश्रमात आले होते. सिद्धार्थने मातापित्यांना पाहताच तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. पण आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या तोंडातून कंठ फुटला नाही. त्यांनी तेथेही रडून, आक्रोश करून घेतला. त्याला कवटाळले आणि अश्रूंनी जणू अंघोळ घातली.

राजा शुद्धोदन आणि गौतमी रडत असलेली पाहून सिद्धार्थचा सेवक कंटक घोड्याजवळ गेला आणि त्यानेही अश्रुंना वाट मोकळी करून दिली. मोठ्या कष्टाने सिद्धार्थने मातापित्याच्या मिठीतून स्वतःला सोडवले. छन्न एका झाडाखाली कंटक घोड्यासह उभा होता. सिद्धार्थ तेथे गेला. त्याने राजवस्त्रे व अलंकार तेथे उतरवली आणि ती छन्नकडे घरी परत नेण्यासाठी दिली.

नंतर सिद्धार्थने स्वतःचे मुंडन करून घेतले. सिद्धार्थचा चुलतभाऊ महानाम तेथेच उभा होता. त्याने सिद्धार्थला संन्यास्याची वस्त्रे आणि भीक्षापात्र दिले. राजपूत्र सिद्धार्थने ती वस्त्रे परिधान केली आणि आश्रमात भारद्वाज ऋषीकडे जाऊन संन्यास्याची दीक्षा घेतली. अशा प्रकारे राजवैभवात लोळणाऱ्या, सुखसागरात विसावणाऱ्या एका राजपुत्राने सर्वस्वाचा त्याग करून सन्यासाश्रमात प्रवेश केला.

सिद्धार्थने परिव्रज्या घेतल्यानंतर लगेचच आपल्या राज्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आश्रमात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता. सिद्धार्थ आश्रमाबाहेर पडताच जनसमुदायही हळूहळू त्याच्या पाठीमागे जाऊ लागला.

सिद्‌धार्थने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले, तर संपूर्ण जनसमुदाय त्याच्या मागोमाग येत होता. तो थांबता आणि त्या जनसमुदायवा उद्देशून म्हणाला,

” बंधूनो, भगिनींनी माझ्या मागोमाग येऊन काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला माहीतच आहे, की मी शाक्य आणि कोलंबिया यांचे भांडण मिटविण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यात मला अपयश आले. तडजोडीसाठी दोन्ही बाजूंचे लोकमत तयार केलात तर कदाचित तुम्ही यशस्वी व्हाल, पण त्यांसाठी तुम्ही मागे फिरा. माझ्या निर्णयात काहीही बदल होणार नाही.”

परिव्रज्या घेऊन टाकून दिलेली वस्त्रे शुद्घोदन आणि प्रजापती यांनी कवटाळून घेतली आणि पुन्हा एकदा त्यांनी आक्रोश केला.ती वस्त्रे त्यांनी एका कमळाच्या तळ्यात टाकली आणि ते दोघे राजवाड्याकडे परतले.

सि‌द्धार्थ गौतमाने परिव्रज्या घेत‌ली, तेव्हा त्याचे वय 29 वर्षे होते. त्याने स्वेच्छेने केलेला तो महान त्याग होता. तितकाच त्याग त्याच्या पत्नीचा होता. तिने म्हणजे यशोदरेने सिद्धार्थला परिव्रज्यासाठी प्रोत्साहन दिले. जगाच्या सुखासाठी आणि शांतीसाठी काहीतरी मार्ग शोधून काढा, असे यशोदरेने स्वतःहून सुचवले. तिने पुत्र राहूल आणि सिद्धार्थच्या मातापित्यांची सांभाळण्याची जबाबदी स्वीकारली होती. सि‌द्धार्थ गौतमाच्या कार्यात अडथळा बनून ती राहिली नाही. म्हणूनच यशोदरा श्रेष्ठ तपस्वी होती. त्यागी होती. सि‌द्धार्थ गौतमने यशोदरा आणि राहुल यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप ठेवला जातो, तो साफ चुकीचा आहे.

सि‌द्धार्थने कपिलवस्तू सोडल्यानंतर नगरात एकच चर्चा होती, ती म्हणजे सिद्घार्थची!

एक राजपुत्र असून सर्व सुखाचा त्याग करून संन्यास पत्करणे एवढे सोपे आहे का? धन्य ती माता पिता! धन्य ती यशोदरा आणि धन्य तो सिद्‌धार्थ !

सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात अचानक मिळालेल्या या वळणामुळे जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीच मार्ग सापडला.

Leave a comment