AI तंत्रज्ञानाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. जवळ जवळ सर्वच क्षेत्रात AI चा शिरकाव झाला आहे. शिक्षण, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, विधी, साहित्य, संस्कृती, संगीत ,संशोधन, भाषा विकास अशा विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाने जन्माला घातलेल्या चॅट-जीपीटी चा वापर वाढत आहे.
What is Chat-GPT ? चॅट-जीपीटी हे काय आहे?
Chat GPT [चॅट जीपीटी] हे एक चॅटबॉट आहे. तो एक आभासी जोडीदार म्हणजेच Virtual Assistant आहे. हा चॅट बॉट म्हणजेच चॅट जीपीटी Open AI ने विकसित केला असून या चॅट जीपीटीचा जन्म म्हणजेच Chat-GPT या Artificial Intelligence tool चा जन्म 30 नोव्हेंबर 2022 साली झाला. AI चा जन्म 1956 साली झाला आणि Chat-GPT चा जन्म त्यानंतर 66 वर्षांनी झाला. AI मग बाल्यावस्थेत असले तरी नेते नवनवीन टूल्सना जन्माला घालून आपला विकसितपणा सिद्ध करीत आहे.
AI च्या वाढत्या प्रभावामुळे आणि महत्त्वामुळे AI क्षेत्रात वेगाने गुंतवणूक होत आहे. सध्या जगभरात 20 कोटीहून अधिक AI चे वापरकर्ते आहेत. यावरून AI चे महत्त्व आपल्या लक्षात येते. AI ने विकसित केलेल्या GPT च्या अनेक मालिकाही निघत आहेत. GPT-4 GPT-3.5 या त्या मालिका आहेत. भविष्यात अशा अनेक मालिका पाहायला मिळतीत.
Chat-GPT चा Long form काय ?
Chat-GPT चा Chat Generative Pri-Trained Transformer असा लाँग फॉर्म आहे. तो आपल्याला माहीत असायला हवा. यालाच चॅट-बॉट असेही म्हणतात. Chat-GPT या ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आपण अनेक समस्यांचे समाधान करू शकतो.
गेल्या दोन वर्षांत AI साधनांनी म्हणजेच chat-GPT सारख्या AI साधनांनी जगभरात क्रांतिकारक पावले टाकली आहेत. मानवी जीवनशैली अक्षरशः बदलून टाकली आहे. शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रांवर प्रचंड प्रभाव- टाकणारी ही एक नवीनच तंत्रज्ञान संस्था बनलेली आहे.
महाराष्ट्र राज्यातही चॅट-जीपीटीचे स्वरूप आणि आणि व्याप्ती वाढत आहे . भारत हा तर चॅट-जीपीटी क्षेत्रात सर्वाधिक सर्वाधिक वापरकर्ता देश ठरला आहे. भारतातील लोक संख्येच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे.
महाराष्ट्रातील चॅट-जीपीटीचा वापर- Use of Chat- GPT in Maharashtra..
(A) शिक्षण: Education
महाराष्ट्रातील शिक्षण प्रक्रियेत चॅट-जीपीटीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. विविध विद्यापीठे सर्वच क्षेत्रातील संशोधने, विविध कृतियुक्त प्रकल्प, संभाषण कौशल्य, गुंतागुंतीचे विषय आणि समस्या सोडवण्यासाठी, नवनवे संशोधनात्मक निबंध लिहिण्यासाठी चॅट-जीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान संशोधन आणि प्रकल्प क्षेत्रात अचूकता येत आहे. भविष्यात चॅट-जीपीटीचा वापर माध्यमिक, उच्च माध्यमिक क्षेत्रात निश्वितच वाढेल आणि शिक्षण प्रक्रिया सुलभ होईल. त्याही पुढे आऊन असे म्हणता येईल की सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा चॅट-जीपीटीचा वापर होईल, अशी आशा आहे.
(B) शेती: Agriculture
कृषी हे असे क्षेत्र आहे की त्याची व्याप्ती सर्वात अधिक आहे. कृषीशी संबंधित व्यवसाय करणारेही अधिक आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील केवळ तंत्रज्ञान विकसित करून उपयोग नाही, तर तंत्रज्ञान वापर करणारा वापरकर्ता हा तंत्रज्ञानात साक्षर झाला पाहिजे. त्यासाठी गावोगावी तज्ज्ञ मार्गदशकांची शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे. अशा शिबिरांमधून चॅट जीपीटीचा वापर कृषी क्षेत्रात कसा करता येतो? याचे Practical Guideline देणे आवश्यक आहे. म्हणजे युजर्सची संख्या वाढेल. युझर्सनाही (शेतकऱ्यांना) चॅट-जीपीटीचा फायदा होईल.
महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी चॅट-जीपीटी चा वापर करत आहेत. मार्गदर्शन मराठीतून होत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. शेतीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे? पिकाची उत्पादन क्षमता कशी वाढवावी ? पिकांचे विविध रोगांपासून कसे संरक्षण करावे ? बदलत्या हवामानाची माहिती कशी मिळवावी? कोणती नवनवीन बियाणे वापरावीत? पिकांची निगा कशी राखावी ? त्यांना पोषक खते आणि आणि पाणी यांचा योग्य मात्रा कसा द्यावा ? याबाबत सविस्तर माहिती चॅट जीपीटीच्या माध्यमातून मिळू शकते.
(c) साहित्य: Literature
शेती, शिक्षाण क्षेत्रात जशी प्रगती होत चालली आहे, तशीच प्रगती साहित्य (Literature) क्षेत्रातही होत आहे. साहित्य क्षेत्रातील साचेबंद लेखन हळूहळू कमी होत आहे. साहित्य क्षेत्रातील लेखनातही नवेनवे प्रयोग येत आहेत. याची माहिती घेण्यासाठी आणि वाचकवर्गाला कोणत्या गोष्टी आवडतात ? हे समजण्यासाठी नवोदित लेखकांनी चॅट-जीपीटीचा वापर करून लेखन केल्यास त्यांच्या लेखनात आणि लेखन शैलीत क्रांतिकारक बदल जाणवतील.
(D) व्यवसाय: Business
व्यवसाय क्षेत्राशी संबंधित अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी Chat-GPT चा वापर केला जातो. सध्याच्या परिस्थितीत आपण कोणता व्यवसाय निवडावा ? निवडलेला व्यवसाय कोणत्या भागात किंवा प्रदेशात अधिक सक्षमपणे चालेल? त्या व्यवसायासाठी साधनसंसाधने कशी मिळवावीत? व्यवसायाचे तंत्रशुद्ध काम कसे करावे ? नियोजन कसे करावे? आपल्या व्यवसायात किंवा उद्योगात तयार झालेला माल कुठे विकला जाईल? त्याला चांगल्या पद्धतीचा दर कसा मिळेल ? व्यवसायासाठी आवश्यक जाहिरात कशी करावी ? Social Media पोस्ट कशी तयार करावी? याबाबत उत्तम मार्गदर्शन आपल्याला चॅट-GPT तंत्राद्वारे मिळू शकते,
(E) कायदा: Law
विधी क्षेत्राबाबत अनेकांचे अज्ञान असते. कायद्याची संबंधित प्राथमिक माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित खरेदी-विक्रीची माहिती, प्लॉट खरेदी विक्रीची माहिती, कौटुंबिक कलहातून झालेले वाद नागरिकांचे हक्क आणि न्याय याबाबत आपल्याला सविस्तर माहिती मिळण्यासाठी आणि कायदेविषयक योग्य सल्ला मिळण्यासाठी Chat-GPT तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपली फसवणूक होणार नाही.
चॅट-जीपीटीचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ? What Precaution should be taken while using Chat-GPT?
(A) गोपनीय माहिती शेअर करु नये : Do not share Confidential Information
आपली वैयक्तिक कोणतीही गोपनीय अथवा संवेदनशील माहिती शेअर करु नये. बँकिंग क्षेत्राशी संबंधित माहिती गोपनीय ठेवावी. ती शेअर करून नये. अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.
(B) अंधश्रद्धा टाळावी : Superstition should be Avoided
चॅट-जीपीटीने दिलेली माहिती ही बरोबरच आहे किंवा असते, असे गृहीत न धरता त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(C) प्रश्न विचारण्यात स्पष्टता हवी : Asking Questions should be Clear
चॅट- जीपीटीच्या माध्यमातून आपण जे प्रश्न विचारणार आहोत ते स्पष्ट असावेत. तुमचे प्रश्न चॅट बॉटला (Chat bot) समजायला हवेत. प्रश्नांची रचना स्पष्ट हवी. प्रश्नांची दिशा चुकल्यास अपेक्षित उत्तर चुकू शकते.
(D) चॅट-जीपीटी हे एक पूरक साधन आहे हे लक्षात ठेवा. Remember that, chat GPT is a complementary tool.
चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हमखास आणि अचूक मार्गदर्शन मिळणारच या भ्रमात न राहता आपल्याला दिशा देणारे ते एक पूरक साधन आहे.चॅट-जीपीटी म्हणजे सर्वस्व नव्हे. हे नेहमी लक्षात ठेवावे. शेवटी ती एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. तिला मर्यादा आहेत.